जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शन

ऑनलाईन वेबीनारचे आयोजन

नवी मुंबई : जात प्रमाणपत्र धारकांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे अर्ज, त्यासोबत सादर करावयाची कागदपत्रांची माहिती याबाबत येणार्‍या अडी-अडचणी व शंकांचे निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन करिण्याकरिता 16 एप्रिल 2021 रोजी दुपारी 2.00 वा. झुम अ‍ॅपवर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ठाणे यांनी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन केले आहे. 

ठाणे जिल्हयातील अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, भटक्या जाती प्रवर्गातील यापैकी कोणत्याही जातीच्या व्यक्तीसाठी एक तर कोणत्याही सरकारी नोकरीमधील किंवा एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशासाठी तरतूद केलेल्या कोणत्याही आरक्षणाचा लाभ मिळावा. याकरिता किंवा भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 15, खंड (4) अन्वये केलेल्या कोणत्याही विशेष तरतूदीखालील कोणताही अन्य लाभ मिळण्याकरीता किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणातील किंवा सरकारी संस्थांमधील निर्वाचित पदे लढविण्याच्या प्रयोजनाकरीता किंवा शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अन्य प्रयोजनाकरीता अशा लाभाची मागणी करतांना, जिने जाती प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते, अशा जाती प्रवर्गातील व्यक्ती जाती प्रमाणपत्रधारक व्यक्तीस जात प्रमाणपत्राची पडताळणी करून जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र धारकांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे अर्ज, त्यासोबत सादर करावयाची कागदपत्रांची माहिती व मार्गदर्शन यासाठी दि.16एप्रिल 2021 रोजी दुपारी 2.00 वा. झुम अ‍ॅपवर वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठीCVC Thane is inviting you to a scheduled Zoom meeting. Topic:Doubt Clarence Time:­pr 16,2021 02:00PM² India Join Zoom Meeting, https://us05web.zoom.us/j/86960985555?pwd=SmtDbE5rVkIHdVFSTIFQUFRUc2tidz09 या लिंकचा वापर करावा. तसेच  Meeting ID: 86960985555 d Passcode: gWCR3c चा वापर करण्यात यावा.

इच्छुक महाविद्यालयीन प्राचार्य, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी या वेबीनारमध्ये मोठया संख्येने सहभाग घेऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ठाणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.