डी.वाय.पाटील कलारागतर्फे ऑनलाईन स्पर्धा

नवी मुंबई : सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मानसिक संतुलन राखणे हे अत्यंत आवश्यक झाले आहे आणि त्या साठी स्वत मधील कलांचा विकास करणे हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. त्या अनुषंगाने डॉ. डी. वाय.पाटील विद्यापीठाच्या रामराव आदिक इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कलाराग या डी वाय.फेस्ट या मंचाद्वारे यावर्षी ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.  

यामध्ये सध्यस्थितीत सर्वत्र प्रचलित असलेला स्टँड अप कॉमेडी चा कलाविष्कार नजरेसमोर ठेवून या वर्षी नवीन स्पर्धा समाविष्ट करण्यात आली आहे ती म्हणजे जोक्स् अ पार्ट ओपन स्टँड अप कॉमेडी. या स्पर्धेच्या प्रवेश नोंदणीसाठी अंतिम तारीख ही 19 एप्रिल असून त्याचा निकाल 25 एप्रिलला जाहीर होणार आहे. याचे प्रवेश शुल्क 100 रुपये आहे. प्रथम पारितोषिक 3000 रुपये व द्वितीय पारितोषिक 1500 रुपये आहे.  अनेक दिग्गज कलाकारांची कारकीर्द ही नाट्य स्पर्धांद्वारे झालेली आहे. ह्या प्रकारच्या उत्साही नवोदित कलाकारांसाठी एकरंग खुली एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या प्रवेश नोंदणीसाठी अंतिम तारीख ही 17 एप्रिल असून त्याचा निकाल 24 एप्रिलला जाहीर होणार आहे. याचे प्रवेश शुल्क 100 रुपये आहे. प्रथम पारितोषिक 4000 रुपये, द्वितीय पारितोषिक 2000 रुपये आणि तृतीय पारितोषिक 1000 रुपये आहे.  

तर फोटोग्राफर बनू इच्छिणाऱयांसाठी - महाक्ष ही एक देशव्यापी स्पर्धा आयोजित करण्यात आली असुन या स्पर्धेतील  चित्रांचे ऑनलाईन प्रदर्शन देखील भरवले जाणार आहे. फोटोग्राफीचे विषय नाईट फोटोग्राफी, आर्किटेक्चर फोटोग्राफी आणि रिफ्लेक्शन फोटोग्राफी आहे. स्पर्धेच्या प्रवेश नोंदणीसाठी अंतिम तारीख ही 19 एप्रिल असून त्याचा निकाल 24 एप्रिल ला जाहीर होणार आहे व त्यानंतर ऑनलाईन प्रदर्शन सुरू करण्यात येईल. याचे प्रवेश शुल्क 80 रुपये आहे. प्रथम पारितोषिक 3000 रुपये व द्वितीय पारितोषिक 2000 रुपये आहे. पारितोषिकं प्रत्येक विषयासाठी असतील. प्रत्येक स्पर्धेची अंतिम फेरी 24 एप्रिल व 25 एप्रिल ला होणार आहे. या सर्व स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात होणार असून त्या कलारागच्या सोशल मीडिया माध्यमाद्वारे प्रसारीत करण्यात येतील. अधिक माहिती कलारागच्या वेबसाईट  dyfest.raitkalaraag.in वर मिळेल.