वृद्धाश्रमातही कोरोनाचा शिरकाव

14 निराधार गंभीर आजारी ; 61 वृद्धापैकी 56 कोरोना पॉझिटिव्ह 

मुंबई : कोरोना विषाणूने पुन्हा एकदा राज्यात हातपाय पसरले आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कोणत्याच वयोगटातील लोकांना विषाणूने सोडलं नाही. तळोजा येथील वृद्धाश्रमात 56 जणांना कोरोनाची लागण झाली असून 14 जणांची प्रकृती गंभीर आहे. 

कोरोनाचा सध्या उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाची  परिस्थिती चिंता करणारी आहे. राज्यातील इतर शहराप्रमाणे नवी मुंबई पनवेलमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस येथील रुग्णसंख्या वाढत आहे. तळोजा येथील वृद्धाश्रमात 56 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आबानंद वृद्धाश्रम येथे अनेकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. वृद्धाश्रमात 61 निराधार वृद्धापैकी 56 वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे 14 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.