राज्यात 15 दिवस कडक लॉकडाऊनची शक्यता

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊन लागू करणे महत्वाचे आहे. त्यामुळेच राज्यात लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत कडक लॉकडाऊनवर गंभीर चर्चा करण्यात आली.  

सध्या राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र त्यातही लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तसेच सार्वजनिक वाहतूकही अत्यावश्यक सेवेसाठी सुरु आहे. त्यामुळे कडक निर्बंध असले तरी त्याचा परिणाम हवा तेवढा होताना दिसत नाही. त्यामुळे 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याची मागणी आज झालेल्या बैठकीत मंत्र्यांनी केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. असलम शेख यांच्या वक्तव्यानुसार 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार सरकार करत आहे. सध्याची परिस्थिती पाहाता 15 दिवस लॉकडाऊन लावावा अशी मागणी अनेक मंत्र्यांनी केली आहे आणि त्यानुसार सरकार आता 15 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा करु शकते.

आरोग्यमंत्री राजेश टोपें यांनी सांगितले की, उद्या रात्री 8 वाजल्यापासून हा कडक लॅाकडाऊन लावला जाईल अशी शक्यता आहे आणि मुख्यमंत्री या बद्दलचे वक्तव्य देतील. तसेच 10वी ची परीक्षा रद्द् करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. वर्षा गायकवाड या बद्दल अधिकृत घोषणा करतील असे ते म्हणाले. परंतु बारावीच्या परीक्षा या होणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे. त्याच बरोबरो लसीकरण करण्यावरती महाराष्ट्र शासन भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.