वर्षभरात 11 पगारवाढीचे करार

प्रतिनिधी : कामगार नेते महेंद्र घरत यांच्या न्यू मॅरीटाईम अ‍ॅन्ड जनरल कामगार संघटनेचे कार्यालय कामगारांसाठी चोवीसतास कार्यरत असते. पावसाळा असो कि कोरोना, कामगारांच्या हक्कासाठी त्यांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी संघटनेचे कार्यालय सदैव कार्यरत असते. मागील वर्षभरापासून कोरोना महामारी असताना सुद्धा संघटनेतर्फे 11 पगारवाढीचे करार करण्यात आले. 2021 सालातील तिसरा करार 1 मे रोजी करण्यात आला.

1 मे या कामगार दिनाच्या पूर्व संधेला, कामगारांचा एप्रिल महिन्याचा पगार वाढवून मिळावा या उद्धेशाने कोरोनाचा विळखा वाढत असताना सुद्धा फक्त कामगारांचे नुकसान होऊ नये म्हणून कामगार नेते महेंद्र घरत यांनी आपल्या शेलघर-उलवे नोड येथील कार्यालयात मे. इंडोको रेमिडीज पाताळगंगा मधील कामगारांसाठी पगारवाढीचा करार केला. मागील वर्षभरापासून संघटना आपल्या तिन कार्यालयामधून कामगारांच्या समस्या सोडवून पगारवाढ करत आहे, त्याच बरोबर कोरोना महामारी मुळे रोजगार गेलेल्या, स्थलांतरित कामगार व गरजूंना आधार देत आहे. आता तर रोजच कोरोना पिडीतांना बेड, व्हेंटिलेटर, इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी मदत करत आहोत असे संघटनेचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी यावेळी सांगितले. या करारनाम्यानुसार कामगारांना 7500 पगारवाढ, 30,000 रुपये बोनस,कोविडसाठी विशेष सुट्या व सुविधा, घरभाडे  30%,  एडखउ  व्यतिरिक्त दोन लाख रुपयांची मेडिकल पॉलिसी, दिवाळी भेट इत्यादी मागण्या मान्य करण्यात आल्या. कोरोना महामारीच्या काळातसुद्धा झालेल्या पगारवाढीमुळे कामगारांमध्ये आनंदाचे  वातावरण आहे.

या करारनाम्याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते महेंद्रशेठ घरत, कार्याध्यक्ष पि. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील,  व्यवस्थापनातर्फे  निलेश भोळे (सिनियर मॅनेजर) प्रविण बोत्रे (एच. आर. मॅनेजर) कामगार प्रतिनिधी किशोर पाटील, कैलास भालेराव, दशरथ वाघे, पि.सी. कोले, मधुकर रसाळ, आदी उपस्थित होते.