खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


बांधकाम व्यावसायिक नलीन शहासह चौघांवर गुन्हा

नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक नलीन शहा व त्यांच्या सहकार्‍यांनी चार निवृत्त नौदल अधिकार्‍यांना गुंतवणुकीवर 20 टक्के व्याज देण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 8 लाख रुपये उकळुन त्यांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. त्यामुळे वाशी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक नलिन शहासह त्यांच्या कंपनीच्या 4 संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.  

या घटनेतील तक्रारदार शैलेंद्रनाथ सिकदार (65) हे भारतीय नौदलातून 2009 मध्ये ते निवृत्त झाले असून ते निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांची चांगल्या ठिकाणी गुंतवणुक करण्याच्या प्रयत्नात ते होते. त्यादरम्यान, डिसेंबर 2010 मध्ये सानपाडा येथे भरलेल्या मालमत्ता प्रदर्शनामध्ये शैलेंद्रनाथ व त्यांच्या सहकार्‍यांची शहा ग्रुप बिल्डर्सचे प्रमुख नलीन शहा यांच्यासोबत ओळख झाली होती. त्यावेळी नलीन शहा यांनी निवृत्त नौदल अधिकार्‍यांना त्यांच्याकडे रक्कम गुंतविण्याबाबत सुचविले होते. तसेच गुंतविलेल्या रक्कमेवर त्यांना वर्षाला 20 टक्के दराने व्याज देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यावेळी  शैलेंद्रनाथ व त्यांच्या सहकार्‍यांनी शहा यांच्या वाशी येथील कार्यालयाला भेट देऊन त्यांच्याकडे रक्कम गुंतविण्याची तयारी दर्शविली होती.  

त्यानंतर शैलेंद्रनाथ यांनी आपल्या निवृत्तीवेतनातील 18 लाख रुपये शहा यांच्याकडे गुंतविले होते. तसेच त्यांचे सहकारी कलाचंद दास यांनी 10 लाख रुपये, बाळाराम नंदी यांनी 75 लाख रुपये, प्रद्युत तरफदार यांनी 5 लाख रुपये अशी एकूण 1 कोटी 8 लाख रुपयांची रक्कम या चौघांनी गुंतविली होती. त्यावेळी या निवृत्त नौदल अधिकार्‍यांनी नलिन शहा यांच्याकडे पैसे दिल्याबाबत कागदोपत्री करार करण्याचा आग्रह धरला होता. मात्र शहा यांनी कोणताही कागदोपत्री करार न करता फक्त पैसे स्विकारल्याच्या पावत्या त्यांना दिल्या. त्यानंतर शहा यांनी सुरुवातीला शैलेंद्रनाथ यांना व्याजापोटी 2 लाख 44 हजारांची रक्कम दिली. मात्र नंतर शहा यांनी व्याज देणे बंद केल्यानंतर शैलेंद्रनाथ व त्यांच्या सहकार्‍यांनी शहा यांच्याकडे व्याज अथवा आपली गुंतविलेली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली.  

मात्र त्यांनी वेगवेगळी कारणे सांगुन वेळ मारुन तसेच त्यांना उडवा उडवीची उत्तरे देऊन त्यांना भेटण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. मात्र त्यानंतर देखील गुंतविलेली मुळ रक्कम परत मिळेल या आशेने शैलेंद्रनाथ यांनी शहा यांच्या विरोधात तक्रार केली नाही. मात्र वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर देखील शहा यांनी गुंतविलेली रक्कम व त्यावरील व्याज न दिल्याने अखेर शैलेंद्रनाथ यांनी वाशी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शहा ग्रुप बिल्डर्सचे प्रमुख नलीन शहा त्यांच्या कंपनीचे संचालक निलम शहा, निरव शहा, राहुल मसने या चौघांवर विश्‍वासघाताने फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट