खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


प्रवास सेल्फ गोलच्या दिशेने

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रवर्त संचालनालय, सीबीआय आणि निवडणूक आयोग यांना हाताशी धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाच राज्यात निवडणूक प्रचार करणे सोयीचे जावे म्हणून बंगालची निवडणूक आठ भागात लावली गेली. गेले दिड महिना चाललेल्या या निवडणुकीत झालेल्या लाखोंच्या प्रचार सभांमुळे आता निकालानंतर बंगाल मध्ये वाढत्या कोरोना संक्रमण  बातम्या येऊ लागल्या आहेत. बंगालच्या निवडणुकीत ममता दीदींनी मागील निवडणुकीपेक्षा अतिशय भरीव कामगिरी केली आहे. तृणमूल काँग्रेसने 216 जागांवर विजय प्राप्त केला आणि एकहाती मोदीसेनेला बंगालच्या मातीत धूळ चारली. ममता दीदींना खिजवण्यासाठी मोदींनी प्रचारसभेत दिलेला ‘दीदी ओ दीदी’ चा नारा त्यांच्यावरच बुमरँग झाला आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दीदींना दैदिप्यमान विजय देऊन गेला. नारीचा अपमान आणि तिच्यावरील वाह्यात टीका टिप्पणी समाज कधीही सहन करत नाही याची पुन्हा एकदा जाणीव बंगालवासियांनी या निवडणुकीच्या माध्यमातून तथाकथित भारतीय संस्कृती रक्षकांना करून दिली. भाजपचा झालेला पराभव हा त्यांच्याच सेल्फ गोल ने झाला असून त्यास मोदी-शहा जोडीचा फाजील आत्मविश्वास आणि अतिरंजित प्रचार कारणीभूत मनाला जात आहे.

पश्चिम बंगाल मधील भाजपचा पराभव हा सत्तापिपासू वृत्तीचा पराभव मानला जात आहे. ममता बॅनर्जी या देशातील एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत. बंगाल मध्ये 42 खासदारांची संख्या असून दिल्लीतील सत्ता स्थापन करण्यासाठी एव्हढे मोठे संख्याबळ असलेले राज्य हाती असावे हि मोदींची इच्छा काही वावगी नाही. सध्या बीजेपीकडे 310 खासदारांचे संख्याबळ जरी असले तरी त्यातून सध्या राजस्थान (25), महाराष्ट्र(48) झारखंड (14) हि राज्ये विरोधकांकडे असून मध्यप्रदेश(28), बिहार(40) मधील भाजपाला मिळालेली सत्ता हि काठावरील असल्याने या चार राज्यातून 60 ते 70 खासदारांचा फटका 2024 साली बसल्यास तो बंगाल आणि दक्षिण भारतातून भरून काढण्याची रणनीती भाजपने आखली होती. मागील निवडणुकीत 18 खासदार बंगाल मधून निवडून आल्याने यावेळी राज्यातच सत्ता आणण्याची रणनीती मोदी-शहा यांनी आखली होती. त्याची तयारी त्यांनी वर्षभर आधीपासून सुरु करून संपूर्ण बंगाल ‘जय श्री राम’ च्या आरोळ्यांनी दुमदुमून टाकले. दीदींना रामाचा तिटकारा असल्याचा जावई शोध त्यांनी लावून दीदी जेथे जातील तेथे ‘जय श्री राम’ चा नंदीघोष सुरु केला. मोदींसोबत झालेल्या समारंभात या घटनेचा तीव्र निषेध ममाताजींनी मोदींसमोर करून आपणही कोणाला घाबरत नसल्याचे ठणकावून सांगितले.  

लोकसभा निवडणुकीत 118 जागांवर बढत मिळाल्याने सत्ता आता हाकेच्या अंतरावर असल्याने गेल्या वर्षभरापासून तृणमूल काँग्रेस तोडण्याचा सपाटा भाजपने लावला. त्यामध्ये 46 आमदारांनी राजीनामा देऊन भाजपचे कमळ हाती घेतले. काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षातूनही उमेदवार आयात करून सत्तेची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. ‘जय श्री राम’ चा नारा देऊन बंगाल मध्ये 70% लोकसंख्या असलेल्या हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. हिंदू-मुस्लिम समाजात धर्माच्या नावावर फूट पाडूनही पहिली. बांगलादेशी मुसलमानांची मते मिळवण्यासाठी बांगलादेशच्या स्वातंत्र्य दिनात हजेरी लावून आपणही बांगलादेश मुक्ती आंदोलनात जेल मध्ये गेलो हे सांगण्यास  मोदी विसरले नाहीत. निवडणुकीच्या महिनाभर आधी सीबीआय, प्रवर्त निर्देशनालयाचा वापरही करून झाला, त्याचा प्रचार गोदी मीडिया मार्फत करून देशभर तृणमूल काँग्रेस विरोधात हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘अबकी बार दोसो के पार’ म्हणत रणांगणात उतरलेल्या मोदींना मात्र 75 जागांपुढे मजल मारता आली नाही याला कारणीभूत ठरला तो भाजपचा विखारी प्रचार आणि ममता बॅनर्जी यांची निवडणूक रणनीती. 

ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीपासून स्वतः आघाडीवर राहून लढ्याचे नेतृत्व केले. ‘जय श्री राम’ च्या नार्‍याला ‘जय दुर्गा’ चा नारा देत बीजेपीच्या धार्मिक प्रचाराला पहिल्यांदा खीळ घातली. बीजेपीसाठी हे अनपेक्षित होते कारण बंगालमध्ये दुर्गापूजा प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. दीदींनी स्टेजवरच स्वतः चंडिका स्तोत्र म्हणून बीजेपीचा निवडणूक रणनीतीतील हवाच काढली. नंदीग्राम मधून शुभेंदु अधिकारी यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी आपली  उमेदवारीही नंदीग्राम मधून जाहीर करून भाजपच्या सेनापतीलाच अंगावर घेतले. त्यांच्या या राजकीय खेळीने तृणमूल कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आणि निवडणुकीची हवाच पलटवून दिली. सुमारे 70 विधानसभा जागांवर शुभेंदु अधिकारी यांचा प्रभाव होता, पण दीदींच्या नंदिग्रामातील उमेदवारीमुळे शुभेंदु अधिकारी मात्र नंदीग्राम मधेच अडकून पडले आणि त्याचा फटका बीजेपीला बसला. या आगीत तेल ओतले ते मोदी यांच्या ‘दीदी ओ दीदी’ या हाकेने. भाड्याने आणलेला जमाव मोदींच्या या हाकेला मोठा प्रतिसाद द्यायचा तसा मोदींचाही जोश प्रत्येक सभेत वाढू लागला आणि तेथेच घात झाला. त्यांच्या हाकेत प्रेम नव्हे तर हेटाळणी आहे याची जाणीव बंगालवासियांना झाली आणि बंगालची अस्मिता जागी होऊन स्त्रीवर्गाने मोदींच्या विरोधात मतदान केले. सायलेंट मतदारानेच दगा दिल्याने निवडणुकीचे चित्रच पालटले आणि सत्तेचे स्वप्न पाहणार्‍या बीजेपीला स्वतःच्या कर्मानेच अपयश चाखावे लागले.

दीदींचा शपथ विधी झाला असून एव्हढा पैसा आणि कार्यकर्ता बंगाल मध्ये उतरवूनही सत्ता न मिळाल्याचे शल्य मोदी-शहा यांना आहे. पाच राज्यातील निवडणुकीत फक्त दोन राज्यातच सत्ता मिळवता आल्याने काहीशी निराशा भाजपमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच कोरोनाच्या संक्रमणाने देशात भयानक रूप धारण केले असून दररोज चार लाखांहून अधिक आकडे जाहीर होत आहेत. दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार आणि गुजरात मध्ये कोरोना तांडव करत असून औषधे, अपुरा ऑक्सिजनचा पुरवठा आणि केंद्रसरकारच्या लसीकरणातील उदासीनतेमुळे आज देशात मृत्यूने थैमान घातले आहे. ज्यावेळी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता देशातील तज्ज्ञ व्यक्त करत होते तेव्हा देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री बिहार आणि बंगाल राज्यातील निवडणुकीत गुंतले असल्याने प्रचंड रोष जनतेत पसरला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर याची दखल मीडियाने घेतली असून देशातील वाढत्या संक्रमणाला मोदींचा  निष्काळजीपण जबाबदार धरला जात आहे. दररोज हजारो मृत्यू देशात होत असून शिव्यांची लाखोली त्यांच्या नातेवाईकांकडून वाहिली जात आहे. केंद्र सरकारच्या या निष्काळजीपणाची मोठी किंमत देशाला चुकवावी लागेल त्याच बरोबर देशातील नागरिकही त्यात भरडला जाणार आहे. पुन्हा देश लॉकडाउनच्या उंबरठ्यावर असून अर्थव्यवस्थाही पुन्हा हळूहळू मान टाकत असल्याचे संकेत अर्थतज्ज्ञांकडून मिळत आहे. 

देशातील लोक त्राहीमाम करत असताना एवढे दिवस शांत असलेल्या न्याय व्यवस्थेलाही आता कंठ फुटू लागला असला तरी त्यांचेही बोल बोबडेच असल्याचे जाणवत आहे. अनेक राज्यातील उच्च न्यायालयांनी त्या त्या राज्यातील भयानक परिस्थितीबद्दल दखल घेतल्यावर सर्वोच्य न्यायालयही आता सक्रिय झाले आहे, हेही नसे थोडके. कोरोना संक्रमणाच्या काळात देशात निवडणुका होत असताना, कोरोना नियम पायदळी तुडवून लाखोंच्या सभा होऊ देणार्‍या निवडणूक आयोगाला, हजारो कोटी खर्चुन लाखों लोकांना एकत्र आणणारा कुंभ मेळावा भरविण्यास परवानगी देणार्‍या सरकारला सर्वोच्य न्यायालयाने वेळीच का नाही रोखले हा खरा जनतेचा सवाल आहे. निवडणुकीत आणि कुंभ मेळाव्यात झालेला खर्च हा कोरोनाच्या लढाईत वापरता आला असता, पण सत्तेचा आणि धर्माचा उच्छाद मांडणार्‍यांनी जनतेच्या हितापेक्षा कर्मकांडालाच महत्व दिल्याने देशात मृत्यू थैमान घालत आहे. जगात सर्वांनी कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय योजला असताना आपल्या देशात मात्र उलटे चित्र पाहायला मिळत आहे. तीस हजार कोटींची लसीकरणासाठी अर्थसंकल्पात तरतूद असताना फक्त 2500 कोटींच सरकारने का खर्च केले?  हा प्रश्न सरकारला विचारणे गरजेचे आहे. सगळीकडून शि-थु झाल्यावर आता कुठे सतराशे कोटींची ऑर्डर सिरमला देण्यात आली असून बाहेरील देशातून लसी मागवण्याची परवानगीही देण्यात आली आहे. देशाच्या नेतृत्वाकडे नसलेली दूरदृष्टी आणि  योग्य निर्णय क्षमता या सर्वाला जबाबदार आहे. तुम्ही प्रचारतंत्राचा चुकीचा वापर करून जनतेला फसवू शकता पण नेत्याच्या नेतृत्वाची पारख हि संकट काळात होत असते. सध्या भाजपाकडे सक्षम नेतृत्वाची वानवा असल्याने भाजपचा प्रवास सेल्फ गोलच्या दिशेने होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट