खारकोपर गावातील जलकुंभाचेे भुमीपूजन

नवी मुंबई ः गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील कोपर (खारकोपर) गावातील सिडको मार्फत मंजूर करण्यात आलेल्या बहुप्रलंबित जलकुंभाचे भ्ाुमीपूजन सोमवार 17 मे रोजी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते संपन्न झाला. 

जीएसआर 4 लाख लिटर्स, तर ईएसआर 2 लाख लीटर क्षमता असलेल्या सिडकोच्या माध्यमातून सव्वाकोटी रूपये खर्चून हा जलकुंभ बांधण्यात येत आहे. कामगार नेते महेंद्र घरत 1997 साली जिल्हापरिषद सदस्य असताना पनवेल तालुक्यात जिल्हापरिषद निधी व पायलट योजनेतून, तसेच ग्रामविकास निधीतून तब्बल 55 जलकुंभ गव्हाण कोपर-शेलघर-करंजाडे-पळस्पे-वडघर, पडघे आदि गावांमध्ये बांधण्यात आले होते. 20-22 वर्षांनंतर सततच्या वापरानंतर व गावातील लोकसंख्येमध्ये सिडको नोडल विकासामुळे, लोकसंख्या वाढीमुळे पाणीपुरवठा कमी पडु लागला म्हणून सातत्याने सिडको व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करण्याचे काम केले. गव्हाण गावातील नविन जलकुंभाचे काम अंतिम टप्यात आले असून सोमवारी कोपर गावातील जलकुंभाचे भ्ाुमीपुजन झाले. इतर प्रकल्पबाधीत गावातील जलकुंभांच्या कामाचा पाठपुरावा सिडकोकडे चालू आहे. भुमीपूजनावेळी सिडकोचे कार्यकारी अभियंता राम मोहोड साहेब, सहाय्यक खान साहेब, बिजेपी नेते भार्गव ठाकूर, अजय पाटील, उपसरपंच सचिन घरत, ग्रा.प. सदस्य विजय घरत, ग्रा. सदस्या  सुनिता घरत, सुधिर ठाकूर, रामदास ठाकूर, गजानन ठाकूर तसेच कोपर ग्रामस्थ उपस्थित होते.