रयतमधून सुनिल जाधव सेवानिवृत्त

नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेचे वाशी येथिल कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक सुनिल दत्तात्रय जाधव हे आपल्या 66 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सोमवारी सेवानिवृत्त झाले. 

दत्तात्रय जाधव हे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळात कार्यरत होते. तब्बल 66 वर्ष 9 महिने आणि 20 दिवसाच्या सेवेनंतर दत्तात्रय जाधव हे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्यासह भौतिकशास्त्र विभागाचे प्रयोगशाळा सहाय्यक कुंडलिक गवारी तसेच एमसिव्हीसी विभागाचे प्राध्यापक गोरक्षनाथ रंगनाथ पवार हे देखिल सेवानिवृत्त झाले.  

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुभदा नायक, उपप्राचार्य सी.डी. भोसले, राजश्री घोरपडे, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य डी.जी. बोटे आणि महाविद्यालयातील टीचीग नॉनटीचीग कर्मचारी उपस्थित होते.