कोकण भवन उपहारगृहातील कर्मचारी सेवानिवृत्त

नवी मुंबई : राज्य शासनाच्या कोकण भवन येथील अधिकारी-कर्मचारी उपहारगृहातील कृष्णा जानू भालचीम आणि अनंता पाटील हे दोन कर्मचारी आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सोमवार 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. 

कोकण विभागीय महसूल कार्यालय सीबीडी येथील कोकण भवन या ठिकाणी काम करणारे शासकीय कर्मचारी-अधिकारी व कामासाठी येणारे नागरिक यांच्यासाठी शासनातर्फे उपहारगृह चालविण्यात येते. कृष्णा भालचीम व अनंता पाटील हे दोघेही 12 ते 14 व्या वर्षी कोकणभवन उपहारगृह येथे कामाला लागले. 

भालचीम हे बॉयवेठर ते आचारी आणि आचारी ते कुपन पोता असा नोकरितील जीवन प्रवास केला. त्याचप्रमाणे अनंता पाटील हे बॉयवेठर असुनही ते एक उत्तम चहा बनविणार व उत्तम आचारी व मापाडी सर्व कामात आपला ठसा उमटवला आहे. या दोन्ही कर्मचार्‍यांनी सदर उपहारगृहात तब्बल 30 वर्षापासून सेवा केल्यानंतर 31 मे रोजी  सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची यापुढील वाटचालीसाठी आपणा दोघांनाही सेवानिवृत्तीनिमित्त पुढील आयुष्य सुखं समृद्धी, भरभराटीचे आणि निरोगी जावो हीच शुभेच्छा मंत्रालय कर्मचारी व अधिकारी वृन्द तसेच विधान भवन, कोकण भवन सर्व उपहारगृह यांच्यातर्फे देण्यात येत आहेत.