परदेशात उच्चशिक्षणासाठी जाणार्‍यांसाठी विशेष लसीकरण

नवी मुंबई ः परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे अशा विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जाऊ नये याकरिता अशा विद्यार्थ्यांसाठी 1 जून 2021 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत सेक्टर 15 नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात पालिकेच्यावतीने विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहे. 

या अनुषंगाने 18 ते 44 वयोगटातील ज्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी परदेशी जायचे आहे त्यांनी या विशेष लसीकरण सत्रात येऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. लसीकरणासाठी येताना सोबत आवश्यक वैध पुरावे म्हणजेच परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचे निश्चिती पत्र, परदेशी व्हिसा आणि सदर व्हिसा मिळण्यासाठी संबंधीत विद्यापीठाकडून प्राप्त झालेले ख-20 किंवा ऊड -160 फॉर्म इ. कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उच्चशिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणार्‍या वय वर्ष 18 ते 44 वयोगटातील विद्यार्थ्यांनी या विशेष लसीकरण सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.