Breaking News
मुंबई : कोरोनाचा धोका लक्षात घेता दहावी पाठोपाठ आता सीबीएसई बारावी बोर्डची परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारनं दोन दिवसात निर्णय घेऊ असं म्हटलं होत. त्याप्रमाणं बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे सीबीएसईच्या 12 वीच्या परीक्षेला बसणार्या सुमारे 12 लाख विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे विद्यार्थी परीक्षा न देता उत्तीर्ण होऊ शकतील. मात्र निकालाचा फॉर्म्युला काय असणार? कोणत्या आधारावर मुलांना पास करणार अशा अनेक प्रश्नांनी विद्यार्थी आणि पालकांत संभ्रम निर्माण झाला आहे.
सीबीएसई बोर्डाची परीक्षा रद्द झाल्यानंतर आता राज्यातील परीक्षाची रद्द होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात राज्यातील बारावी परिक्षाबाबतचा दोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. दहावी प्रमाणे बारावीची परीक्षा न घेण्याची राज्य सरकारची आधीपासूनच मानसिकता आहे. याबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेकडे राज्य सरकारचे लक्ष होते. ऑगस्टमध्ये परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होते, त्यासाठी बारावीचा निकाल महत्त्वाचा असतो. मात्र कोरोनाचे आकडे कमी होईपर्यंत बारावीची परीक्षा घेता येणार नाही.
इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन निकष सध्या तरी जाहीर केले जाणार नाहीत. या मुल्यांकन निकषाला अंतिम रुप देण्यात काही वेळ लागेल, म्हणून ते निकष नंतर प्रसिद्ध केले जातील, असं सीबीएसईने स्पष्ट केलंय. दहावीच्या धर्तीवर सीबीएसई बोर्ड 12 वीच्या मूल्यांकनाचे निकषदेखील ठरवेल, अशीही चर्चा आहे. दहावीसाठीही अशी व्यवस्था केली गेली आहे की, जर विद्यार्थी या प्रक्रियेनंतर दिलेल्या गुणांवर समाधानी नसेल तर त्याला कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा परीक्षेला बसण्याची, हजर राहण्याचीही संधी दिली जाईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai