मनसेची रस्ते आस्थापना विभागाची शहर कार्यकारणी जाहीर

नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व रस्ते साधन सुविधा, आस्थापना विभागाचे अध्यक्ष योगेश परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे नवी मुंबईची रस्ते आस्थापना विभागाची शहर कार्यकारणी जाहीर झाली. यामध्ये नवी मुंबई शहर संघटक पदी संदीप गलुगडे यांची नियुक्ती करण्यात आली. सदरचे नियुक्तीपत्र नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या हस्ते देण्यात आले. 

नेरूळ, बेलापूर उपशहर संघटक पदी गणेश पालवे, कोपरखैरणे, घणसोली उपशहर संघटक पदी महेंद्र पारवे , बेलापूर प्रभाग संघटक पदी शशी कोळी, नेरूळ प्रभाग संघटक पदी सतलींग वटकर , घणसोली प्रभाग संघटक पदी हरीश चव्हाण, दिघा प्रभाग संघटक पदी अजित दावणे, नेरूळ उपप्रभाग संघटक पदी प्रियेश सावंत, घणसोली उपप्रभाग संघटक पदी धनंजय देवकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना गजानन काळे आणि योगेश चिले यांनी मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रस्ते आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष योगेश चिले, उपाध्यक्षा सुनीता चुरी, मनसेचे उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे, शहर सचिव विलास घोणे, सचिन आचरे, रुपेश कदम, सहसचिव अभिजित देसाई, अमोल इंगवले, शैलेश भुतडा विभाग अध्यक्ष अमोल ऐवळे, अभिलेश दंडवते, विशाल चव्हाण, रोहन पाटील, महापालिका कामगार सेनेचे अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, रोजगार सेनेचे शहर संघटक संप्रीत तुर्मेकर, पशहर संघटक अनिकेत पाटील, चित्रपट सेनेचे अध्यक्ष किरण सावंत, शारीरिक सेनेचे अध्यक्ष सागर नाईकरे आणि महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते.