दुसर्‍या विशेष सत्रात 67 विद्यार्थ्यांचे लसीकरण

नवी मुंबई ः उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार्‍या विद्यार्थ्यांची कोव्हीड लसीकरण न झाल्यामुळे अडचण होऊ नये व शैक्षणिक संधी वाया जाऊ नये महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली 31 मे रोजी सेक्टर 15 नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात आयोजित केलेल्या विशेष लसीकरण सत्राचा लाभ परदेशी विद्यापिठात प्रवेश मिळालेल्या 252 विद्यार्थ्यांनी घेतला होता.

तथापि या संधीपासून आणखी काही विद्यार्थी असल्यास ते वंचित राहू नये याकरिता 03 जून रोजी आयोजित केलेल्या विशेष लसीकरण सत्रात 40 युवक व 27 युवती अशा एकूण 67 विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला.