माझी स्वत:ची ऑक्सिजन बँक वृक्षारोपण मोहीम

नवी मुंबई ः 5 जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून ‘वृक्षारोपण’ ही संकल्पना नजरेसमोर ठेवत माझी स्वत:ची ऑक्सिजन बँक या शिर्षकांतर्गत वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

कोव्हीडच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनचे महत्व मोठ्या प्रमाणावर अधोरखित झाले. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या वृक्षांची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. हे वृक्षांचे महत्व जाणत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने वृक्षारोपण करावे व त्याचे जबाबदारीने संवर्धनही करावे यादृष्टीने माझी स्वत:ची ऑक्सिजन बँक ही वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. झाडे लावूया - सेल्फी काढूया व महानगरपालिकेच्या सोशल मिडीयावर झळकूया असे आवाहन करीत ही मोहीम राबविली जात असून नागरिकांना वृक्षारोपणाकरिता मोफत वृक्षरोपे महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत उपलब्ध करून दिली जात आहेत. नागरिकांनी वृक्षारोपण करून झाडासोबतचा सेल्फी पाार्लींर्रीीपवहरीरसारळश्र.लेा या इमेल आयडीवर पाठविल्यास त्यांचा फोटो नवी मुंबई महानगरपालिकेच्या सोशल मिडियावर झळकविण्यात येणार आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी तसेच वृक्षरोपे उपलब्ध करून घेण्याकरिता नागरिकांनी 022-27567064 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.