100 किमीची सायकलिंग करुन महाराजांना मानवंदना

राष्ट्रीय सायकलपटू स्नेहल माळीची कामगिरी

पनवेल : 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून खारघर येथील राष्ट्रीय सायकलपटू स्नेहल माळी हिने खारघर ते खोपोली असा 100 किमीचा प्रवास सायकलद्वारे पार करीत महाराजांना अनोखी मानवंदना दिली.

स्नहेलने नुकतेच पनवेलमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आपला सहभाग नोंदवत कास्य पदक प्राप्त केले होते. महाराजांचा राज्याभिषेक हा प्रत्येकासाठी गौरवाचा दिवस असतो. मी नेहमी सायकलिंग करीत असते. मात्र, या दिवशी महाराजांना मानवंदना द्यावी याकरिता खारघर ते खोपोली असा प्रवास पूर्ण केला. स्नेहल दररोज किमान 50 किमी सायकलिंगची प्रक्टीस करीत असते. मात्र, राज्याभिषेकाच्या दिवशी स्नेहलने 100 किमी सायकलिंग करण्याचा निर्णय घेतला. यावेळी स्नेहलसोबत तीचे प्रशिक्षक राजेंद्र सोनीदेखील उपस्थित होते. स्नेहलचे वडील शत्रुघ्न माळी हे पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांचे नेहमीच स्नेहलला सहकार्य असल्याने स्नेहल अशाप्रकारे आव्हानात्मक पाऊल उचलत असते. दरम्यान, रविवारी पहाटे 6 वाजता स्नेहलने या प्रवासाला सुरुवात केली. कोरोना काळात सध्याच्या घडीला विविध निर्बंध असल्याने स्नेहलने खोपोली येथे महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देत परतीचा मार्ग पकडला.