धुतूम येथे शून्य घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

उरण : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरणास पूरक अशा ग्रामपंचायत धुतूम : निसर्ग ऋण शून्य घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. आयोटीएल कंपनीच्या सीएसार फंडातून रू 26,85,038 खर्च करून उभारण्यात आलेल्या प्रकल्पाचे रायगड जिल्हाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी पर्यावरण दिनानिमित मैदानाच्या सभोवताली वृक्षारोपण देखील केले. तसेच ग्रामपंचायतीने केलेले वृक्ष लागवड व जोपासना याबद्दल सरपंच व ग्रामपंचायतीचे कौतुक केले. 

यापूर्वी हा प्रकल्प पायाभूत सुविधा व ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट खत असा प्रोजेक्ट कार्यान्वित होता. याच्यात संपूर्ण कचर्‍याची विल्हेवाट लागत नसल्याने सरपंच रेश्मा ठाकूर यांनी आयोटीएल यांच्याकडे पाठपुरावा करून सीएसआरच्या माध्यमातून हा संपूर्ण शून्य घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकारला आहे. या  कार्यक्रमाला सरपंच रेश्मा शरद ठाकूर, उपसरपंच सविता रुपेश ठाकूर, माजी उपसरपंच वैशाली किशोर पाटील, माजी उपसरपंच आशा महिंद्र ठाकूर, माजी उपसरपंच सदानंद विठ्ठल ठाकूर, तुकाराम ठाकूर, मेघनाथ ठाकूर, नंदेश ठाकूर, किशोर परब, पाटील डॉक्टर  शतसेच  ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ग्रामपंचायत सदस्य शरद ठाकूर तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक विनोद मोरे यांनी केले. प्रोजेक्टची संपूर्ण माहिती देण्याचे काम साई खानोलकर लास ग्रीनचे डायरेक्टर यांनी केले.