1 लाखाहून अधिक नागरिकांनी घेतले दोन्ही डोस

नवी मुंबई ः 16 जानेवारीपासून कोव्हीड लसीकरणाला सुरुवात झालेली असून सध्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. सद्यस्थितीत 34 लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. सद्यस्थितीत पालिकेच्या वतीने 3 लाख 89 हजार 665 नागरिकांचे कोव्हीड लसीकरण करण्यात आलेले असून त्यामधील 1 लाख 996 नागरिकांनी कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.

कोव्हीड लसीकरणावर विशेष लक्ष देत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यादृष्टीने नियोजनबध्द पावले उचलण्यात येत असून लसीकरण केंद्रांमध्येही लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे. जास्त प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर जलद लसीकरणासाठी 50 पेक्षा अधिक नवीन लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 3 लाख 89 हजार 665 नागरिकांचे कोव्हीड लसीकरण करण्यात आलेले असून त्यामधील 1 लाख 996 नागरिकांनी कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. अशाप्रकारे एकूण 4 लक्ष 90 हजार 661 कोव्हीड लसीचे डोस नागरिकांना देण्यात आलेले आहेत. सध्या शासन स्तरावरून महानगरपालिकेस प्राप्त होणार्‍या लसींच्या पुरवठ्यानुसार दररोजच्या लसीकरणाचे नियोजन केले जात असून त्यास नागरिकांच्या माहितीसाठी सोशल माध्यमांचा वापर करून व्यापक प्रसिध्दी दिली जात आहे. संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी 45 वर्षावरील नागरिकांना किमान 1 डोस देऊन व्हावा असे नियोजन करण्यात आले असून लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी 4 लाख लस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडरही प्रसिध्द करण्यात आलेले आहे.

लसीकरणाचा तपशील -

डॉक्टर्स व इतर आरोग्यकर्मी
पहिला डोस 32381
दुसरा डोस 20240
पोलीस, सुरक्षा. स्वच्छता व इतर पहिल्या फळीतील कोरोना योध्दे
पहिला डोस  27389
दुसरा डोस 13074
ज्येष्ठ नागरिक
पहिला डोस  73916
दुसरा डोस 41738
45 वर्षावरील कोमॉर्बीड व्यक्ती
पहिला डोस  10277
दुसरा डोस 10277
45 ते 60 वयाचे नागरिक
पहिला डोस  128758
दुसरा डोस 14644
18 ते 44 वयाचे नागरिक
पहिला डोस  116944
दुसरा डोस 1023
एकूण
पहिला डोस  389665
दुसरा डोस 100996