गरजूंसाठी आ. गणेश नाईकांचा अखंड मदतयज्ञ

भाजपा आणि गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत धान्यवाटप 

नवी मुंबई ः गेल्या दिड वर्षात कोरोनामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. रोजगार आणि स्वयंरोजगार बुडाले. 35 टक्के जनतेला जीवनावश्यक वस्तूंवर खर्च करणे कठिण होवून बसले. या वर्गासाठी आमदार गणेश नाईक त्यांच्या माध्यमातून मदतीचा अखंड यज्ञ सुरू आहे.

नवी मुंबईत कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून हजारोंना मास्क, सॅनिटायझर, धान्य वाटप करण्यात आले. पालिकेमार्फत शहरात नियमित निर्जंतुकीकरण करून घेण्यात आले.आ. गणेश नाईक पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याबरोबर नियमितपणे कोरोना प्रतिबंधात्मक बैठका घेत असून या बैठकांमधून पालिका प्रशासनाला मौलिक सुचना करीत आहेत. कोरोनामुळे पिचलेल्या नागरिकांसाठी पालिकेला विविध योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. सध्या नवी मुंबई भाजपा आणि गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नवी मुंबईतील सर्व 111 प्रभागात गरजूंना मोफत धान्याचे वाटप सुरू आहे. मोफत धान्य वाटपाचे तीन टप्पे यापूर्वी यशस्वीपणे पूर्ण झाले असून हा चौथा टप्पा सुरू आहे. माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांनी चौथ्या टप्प्यातील मोफत धान्य वाटप उपक्रमाचे सुयोग्य नियोजन केले आहे. साखर, तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ इत्यादींचा यामध्ये समावेष आहे. नवी मुंबईचे कुटुंबप्रमुख म्हणून आमदार गणेश नाईक यांनी पाठविलेले धान्य सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, गाव,गावठाण, झोपडपटटी, अल्प उत्पन्नगट वसाहती इत्यादींमध्ये लोकप्रतिनिधी, भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी वितरित करीत आहेत.  

कोरोनाच्या दोन लाटा आल्या. आता तिसाया लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोरोना काळात नागरिकांची आर्थिक प्रकृती ढासळली आहे. लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या वतीने सामाजिक जाणिवेतून 111 प्रभागात त्या त्या प्रभागातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व पदाधिकाायांच्या माध्यमातून गरजूंना मोफत धान्य वितरित केले जाते आहे. - डॉ. संजीव नाईक, माजी खासदार