ऐरोलीत अनधिकृत बांधकाम कारवाई

नवी मुंबई ः महापालिका क्षेत्रातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे यावर पालिकेच्यावतीने धडक कारवाई करण्यात येत आहे. ऐरोली विभागामध्ये सेक्टर 3 येथील जे-162 व ए-07 याठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता इमारतीचे अनाधिकृतपणे बांधकाम सुरू होते. नोटीस देऊनही बांधकाम सुरुच ठेवल्याने कारवाई करण्यात आली. 

या बांधकामास ऐरोली विभाग कार्यालयामार्फत नोटीस बजावण्यात आलेली होती. नोटीशीस अनुसरून हे अनाधिकृत बांधकाम संबंधितांनी स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी अनाधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते. या अनाधिकृत बांधकामावर ऐरोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात येऊन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. कोपरखैरणे विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी 6 मजूर, 1 गॅस कटर, 2 इलेक्ट्रीक हॅमर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीसांसह ही मोहिम राबविण्यात आली. यापुढील काळात अशाप्रकारची अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.