300 कोविड योद्धा महिलांचा सन्मान

नवी मुंबई ः वाशी रुग्णालयातील परिचारिका आणि महिला सफाई कर्मचारी अशा एकूण 300 महिलांचा कोविड योद्ध्या म्हणुन फ्युचर फर्स्ट फाऊडेशनच्या वतीने कोविडचे सर्व नियम पाळुन साड्या व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या हस्ते या महिलांना सन्मनित करण्यात आले. 

 कोविड काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणार्‍यांमुळे आज लाखो रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णांची सेवा करण्यात दिवसरात्र एक करणारे डॉक्टर, परिचारीका, आरोग्यकर्मी तसेच इतर क्षेत्रातील काही मंडळीही कोरोनाला अटकाव घालण्यासाठी प्रयत्नशील, गरजूंना सढळ हाताने मदत करण्यासाठी   पुढे सरसावत आहेत. अशांचा विविध स्तरावर कोव्हिड योद्धा म्हणून सन्मान करण्यात येतो. फ्युचर फर्स्ट फाऊडेशनच्या वतीनेही कोविड योद्धा म्हणून 300 महिलांना सन्मानित करण्यात आले. यात वाशी रुग्णालयातील परिचारिका आणि महिला सफाई कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या महिलांना साड्या व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास प्रशासन विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबूकस्वार, वाशी विभागातील वॉर्ड ऑफिसर महेश हंशेट्टी तसेच वाशी हॉस्पिटलचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी प्रशांत जवादे उपस्थितीत होते.