कर्नाळा बँकेच्या ठेविदारांचे 6 जुलैला ‘रास्ता रोको’

पनवेल ः कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेविदारांना हक्काचे पैसे परत मिळण्यासाठी तसेच राज्य आणि केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार 6 जुलै रोजी कळंबोली येथील एमजीएम हॉस्पीटलसमोर सकाळी 10.30 वाजता ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा एकमुखी ठराव ठेविदारांनी केला.

कर्नाळ सहकारी बँकेत अनेक ठेवीदारांच्या ठेवी असल्याने 526 कोटींचा घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी ईडीने माजी आमदार विवेक पाटील यांना अटक केली आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात कर्नाळा बँकेच्या शेकडो ठेविदारांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी कांतीलाल कडू यांनी भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर जोरदार टिका केली.  तसेच ठेविदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळण्यासाठी 6 जुलैला ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीतून प्रभाकर उरणकर, टी. नम्रता, अशोक मुणोथ, रमेश महाले, राजाराम इनवटकर आदींनी सुचना केल्या. यावेळी कांतीलाल कडू, डॉ. चंद्रकांत गायकवाड, रत्ना गणेश बडगुजर, प्रतिमा चंद्रकांत मुरबाडकर, विजय मेहता, समिर भगत, चंद्रकांत माने आदींनी मनोगत व्यक्त केले. गणेश वाघिलकर, विकी खारकर, किरण करावकर, भास्कर भोईर, हरेश पाटील, अकुंश म्हात्रे, सचिन पाटील, महेंद्र पाटील, योगेश पगडे आदी उपस्थित होेते.