पंतप्रधान मोदींना पाठवणार एक कोटी पत्र

नवी मुंबई ः मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या हातात असताना केंद्र सरकारकडून कोणतीही आश्वासित पावलं उचलताना दिसत नाहीत यासाठी राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना विनंती देखील केली परंतु तरीही यावर काही निर्णय होताना दिसत नाही. त्यामुळे तमाम मराठा समाजाच्या वतीने केंद्र सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष महेबूब शेख, प्रदेश युवक कार्याध्यक्ष सुरज दादा चव्हाण आणि रविकांत वर्पे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी’ या उपक्रमांतर्गत एक कोटी पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात येत आहेत. याच उपक्रमा अंतर्गत राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी नवी मुंबई यांच्या वतीने सोमवार 21 जून पासून पूर्ण आठवडा नवी मुंबईतील प्रत्येक विभागातून असंख्य पत्रे पाठवण्याचा निर्धार करण्यात आला आणि याची सुरुवात वाशी येथील पोस्ट ऑफिस कार्यालयातून पत्र टाकून करण्यात आली.