20 जून ते 4 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई ; 

नवी मुंबई ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत गेल्या काही दिवसापासून विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष विविध संघटना कडून मोर्चे, आंदोलन, निदर्शने, बंद पुकारणे आणि उपोषण केले जात आहे. दरम्यान 22 जून ते 3 जुलै दरम्यान थोर व्यक्तीचे जयंती, पुण्यतिथी आदी सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार असल्यामुळे नवी मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम (37) (1) (3) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती कारवाई करण्यात येईल असे आदेश पारित करण्यात आले आहे.

पोलिसांची परवानगी नसताना नवी मुंबई विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव देण्यासाठी गुरुवारी सिडकोला घेराव घालण्यावर प्रकल्पग्रस्त ठाम आहेत. याला प्रतिकार करण्यासाठी शिवसैनिकही आमनेसामने येतील, असा इशारा शिवसेनेने दिल्याने विमानतळ नामकरण वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबई पोलिसांनी सावध भूमिका घेत दरम्यान 22 जून रोजी धर्मवीर संभाजी जयंती, 24 जूनला वटपौर्णिमा,26 जून ला छत्रपती शाहू महाराज जयंती आणि 3 जुलै रोजी राजमाता जिजाऊ यांची यांची पुण्यतिथी निमित्त सण, उत्सव साजरे करण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. या काळात पाच पेक्षा अधिक लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त यांच्या पूर्व परवानगी शिवाय सभा, मिरवणुकीस बंदी घालण्यात आली आहे. तसेच या कालावधीत कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य, तसेच दगड, अथवा शस्त्रे,अस्त्रे,सोबत ठेवता येणार नाही. त्याचप्रमाणे सोटे,भाले,तलवारी,दंड,काठ्या,बंदुका, रिव्हॉल्वर, देशीकट्टा, देशी विदेशी अग्निशस्त्रे व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर सोबत, बाळगता येणार नाही. त्याचा बरोबर कोणत्याही इसमाचे, पुढार्‍यांच चित्राचे प्रतिमचे प्रदर्शन व दहन करू नये, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे, राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे किंवा कोणतेही जिन्नस तयार करून जनतेत प्रसार करणे तसेच परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करू नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधीत व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल असे आदेश पोलीस उपआयुक्त अभिजित शिवथरे विशेष शाखा यांनी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने पारित केले आहे.