मतदार नाव नोंदणी, दुरुस्ती दुबार, नाव वगळणीची संधी

पनवेल : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत राज्यातील सर्व विधानसभा मतरसंघाच्या छायाचित्र मतदार यादीचा संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत 100 टक्के शुध्द मतदार यादी तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मतदारांनी मतदार यादी शुध्द करण्यासाठी नाव नोंदणी, दुरुस्ती दुबार नाव वगळणी करुन घेण्यासाठी संबंधीत मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बी.ए.ल ओ.) तहसिल कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

188 पनवेल विधानसभा मतदारसंघात एकूण 570 मतदार यादीभाग आहेत. त्यापैकी 257 यादीभागातील 44 हजार 112 मतदारांचे फोटो मतदार यादीत नसल्याचे आढळून आले आहे. तसेच 190 उरण विधानसभा मतदारसंघातील तालुका पनवेल अंतर्गत 124 यादी भाग असुन त्यामध्ये 2 हजार 22 मतदारांचे फोटो मतदार यादीत नसल्याचे आढळून आले आहे. 

ज्या मतदारांचे रंगीत छायाचित्र मतदार यादीत नाही. अशा मतदारांनी आपले रंगीत फोटो 30 जुनपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी / तलाठी किंवा निवडणुक शाखा तहसिलदार कार्यालय, पनवेल कार्यालयात जमा केले नाहीत तर मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील. 16 जानेवारी 2021 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये नागरिकांनी त्यांच्या मतदारसंघाच्या मतदार यादीत त्यांच्या नावासमोर फोटो आहे किंवा नाही याची खात्री करुन घ्यावी. मतदार यादीत फोटो नसल्यास तात्काळ आपला अद्यावत कलर (रंगीत) पासपोर्ट साईज फोटो संबंधित बीएलओ, तलाठी किंवा निवडणुक शाखा तहसिल कार्यालय पनवेल, कार्यालयात जमा करावेत अन्यथा अशा मतदारांची नावे मतदार यादीतुन वगळण्यात येणार  आहेत. नागरिकांनी मतदार यादी मध्ये नाव नोंदणी, दुरुस्ती अथवा वगळणी बाबत त्यांचे यादीभागीशी संबंधित बि.एल.ओ., तलाठी किंवा निवडणुक शाखा तहसिलदार कार्यालय पनवेल या कार्यालयाशी अथवा raigad.nic.in या संकेतस्थळास कृपया भेट देण्याचे आवाहन विजय तळेकर सह. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार पनवेल यांनी केले आहे.