भाजप पदाधिकारी संदीप म्हात्रे यांच्यावर हल्ला

नवी मुंबई : आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक व माजी नगरसेविका यांचे पती संदीप म्हात्रे यांच्यावर रविवारी कोयत्याने हल्ला झाला आहे. कोपरखैरणे येथील त्यांच्या कार्यालयात घुसून दोन जणांनी कोयत्याने त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ते थोडक्यात बचावले असून हाताला जखम झाली आहे. झटापट करून एकाला पकडले आहे. यापूर्वी देखील त्या मुलांनी म्हात्रे यांच्यावर हल्ला केला होता.

संदीप म्हात्रे हे स्थानिक भाजप नगरसेविका संगीता म्हात्रे यांचे पती असून आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक मानले जातात.  रविवारी संध्याकाळी म्हात्रे हे त्यांच्या कोपरखैरणे सेक्टर 6 मधील जनसंपर्क कार्यालयात बसलेले असताना आत घुसून दोन जणांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात संदीप म्हात्रे यांनी हातावर वार झेलला, त्यामुळे ते थोडक्यात बचावले आहेत. त्यांना उपचारासाठी वाशीतील महानगर पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. एका हल्लेखोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.