जेएनपीटी बंदरात 879 कोटींचे हेरॉईन जप्त

उरण : उरण येथे जेएनपीटी बंदरात महसूल गुप्तचर संचलनालयाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 879 कोटी रुपये किमतीचे 293 किलोग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. हे हेरॉईन इराणमार्गे अफगाणिस्तानमधून जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट बंदरात आयात करण्यात आले होते. जप्त केलेले हेरॉईन पंजाबला नेण्यात येणार असल्याचीही माहिती उघड झाली. 

हेरॉईनची तस्करी करताना आरोपींनी कागदोपत्री तुर्टी आणि सुगंधी पावडरची वाहतूक करत असल्याचे दाखवले होते. त्यामुळे हे हेरॉईन आयातदारालाही पोलिसांनी अटक केलीय, अशी माहिती सूत्रांची दिली. संबंधित माल अफगाणिस्तानहून इराण मार्गे आल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यामध्ये बंदी असलेला माल असण्याचा संशय आल्यानंतर तात्काळ पोलिसांनी तपासणी केली. यात तब्बल 879 कोटी रुपये किमतीचे 293 किलोग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले.