Breaking News
मुंबई : गणपती उत्सवासाठी मुंबईतून कोकणात मोठ्या प्रमाणात गणेशभक्त जात असतात. या गणेश भक्तांचा प्रवास सुखरुप व्हावा यासाठी कोकण मार्गावर विशेष ट्रेन सोडण्यात येतात. यंदाी मध्य रेल्वेमार्फत गणपती उत्सवासाठी कोकणात 72 विशेष गाड्या चालवणार आहे. यातून फक्त आरक्षित तिकीट असणार्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी असेल. गुरुवारपासून या गणपती स्पेशल गाड्यांचे बुकिंग सुरु होणार आहे.
सीएमएसटी, पनवेल, सावंतवाडी दरम्यान या गाड्या चालविल्या जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड विशेष दररोज (36 फेर्या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 5 सप्टेंबरपासून 22 सप्टेंबरपर्यंत 00.20 वाजता सुटून सावंतवाडी रोडला त्याच दिवशी सकाळी 14.00 वाजता पोहोचेल. सावंतवाडी रोड येथून रोज 14.40 वाजता सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुसर्या दिवशी 04.35 वाजता पोहोचेलछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष (10 फेर्या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 6 सप्टेंबरपासून 20 सप्टेंबरपर्यंत दरसोमवारी व शुक्रवारी 13.10 वाजता सुटेल व त्याच दिवशी 22.35 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. रत्नागिरी येथून 9 सप्टेंबरपासून 23 सप्टेंबरपर्यंत दररविवारी आणि गुरुवारी 23.30 वाजता सुटेल. पनवेल-सावंतवाडी रोड त्रि-साप्ताहिक विशेष (16 फेर्या) पनवेल येथून 7 सप्टेंबरपासून 22 सप्टेंबरपर्यंत दरमंगळवार, बुधवार व शनिवारी 08.00 वाजता सुटेल व त्याच दिवशी सावंतवाडी रोडला 20.00 वाजता पोहोचेल. सावंतवाडी रोड येथून 7 ते 22 सप्टेंबरपर्यंत दरमंगळवार, बुधवार आणि शनिवारी 20.45 वाजता सुटून पनवेलला दुसर्या दिवशी 07.10 वाजता पोहोचेल. पनवेल-रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष (10फेर्या) पनवेल येथून 9 सप्टेंबरपासून 23 सप्टेंबरपर्यंत गुरुवार व रविवारी 08.00 वाजता सुटेल व त्याच दिवशी 15.40 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. रत्नागिरी येथून 6 ते 20 सप्टेंबरपर्यंत सोमवारी व शुक्रवारी 23.30 वाजता सुटून दुसर्या दिवशी 06.00 वाजता पनवेलला पोहोचेल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai