अपोलोची निःशुल्क डिजिटल आरोग्य सल्ला-सेवा

‘सेविंग अ-चाईल्डस् हेल्थ इनिशिएटिव्ह’ आणि अपोलो फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

नवी मुंबई : अपोलो हॉस्पिटल्सच्या जॉईंट एमडी डॉ संगीता रेड्डी यांनी गरजू मुलांना दर्जेदार आरोग्यसेवा निःशुल्क आणि समान पद्धतीने उपलब्ध करवून देण्याचे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेवून एका उपक्रमाची संकल्पना तयार केली आहे. यामार्फत अपोलो 24/7 डिजिटल प्लॅटफॉर्ममार्फत एक वर्षभरासाठी (7 जुलै 2022 पर्यंत) अपोलो हॉस्पिटल्सच्या बालरोग तज्ञांचा सल्ला निःशुल्क उपलब्ध करन दिला जाणार  आहे. 

उत्तम आरोग्याचा पाया रचला जावा हे ’सेविंग अ चाईल्डस् हेल्थ इनिशिएटिव्ह’ या लहान मुलांसाठी काम करणार्‍या आशिया खंडातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनेचे लक्ष्य आहे. या भागीदारी अंतर्गत 180 पेक्षा जास्त बालरोग तज्ञ ’साची’च्या या नव्या उपक्रमाला सहयोग देत आहेत. प्रत्येक मुलाला, मग ते कोणत्याही समुदायातील किंवा कोणत्याही पार्श्वभूमीचे असो, त्यांना दर्जेदार आरोग्यसेवा पुरवल्या गेल्या पाहिजेत हे ’साची’चे उद्धिष्ट आहे. 0 ते 14 वर्षे वयोगटाचा एकूण लोकसंख्येतील हिस्सा 26% पेक्षा जास्त असलेल्या आपल्या देशात लहान मुलांचे आरोग्य हा मात्र दुर्लक्षिला गेलेला विषय आहे. आरोग्यसेवा उपलब्ध होण्याच्या आड येणार्‍या बाधा दूर करण्यासाठी साचीच्या या नव्या उपक्रमाला अपोलो 24/7 प्लॅटफॉर्मसोबत जोडण्यात आले आहे. याठिकाणी 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या गरजू मुलांना आपल्या घरूनच विविध केंद्रांमधून डिजिटल सल्ला मिळवता येऊ शकेल. यासाठी त्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी अपोलो फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सीएसआर उपासना कामिनेनी कोनीडेला यांनी सांगितले, डॉ संगीता रेड्डी या नेहमीच लहान मुलांच्या आरोग्याविषयी अतिशय जागरूक आणि संवेदनशील असतात. यासंदर्भातील त्यांच्या संकल्पना आणि आमच्या बालरोग तज्ञांकडून मिळत असलेला सहयोग यामुळे आम्हाला देशभरातील वंचित समुदायांमधील लहान मुलांना आरोग्यसेवा निःशुल्क पुरवण्यात मदत मिळत आहे.