वाढदिवसानिमित्त समाजउपयोगी कार्य

पनवेल  : रायगड भूषण व केअर ऑफ नेचरचे सर्वेसर्वा राजू मुंबईकर यांच्या वाढदिवसानिमित्त रानसई आदिवासी वाडीतील नागरिकांकरिता 150 मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण करून त्याचे लोकार्पण करण्यात आले, तसेच आदिवासी बांधवांना ज्यूसचे वाटप करण्यात आले, श्री एकवीरा देवी मंदिर वेश्वीच्या पायथ्याशी 250 झाडांचे वृक्षारोपण व बेंचेस बसवण्यात आले. 

सदर कार्यक्रमाप्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते  प्रितम म्हात्रे तसेच श्री साई देवस्थान साईनगर व वहाळचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र पाटील, पनवेल अर्बन बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्या पार्वती रवीशेठ पाटील, सारडे विकास मंचाचे रोशन पाटील, रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचे प्रेसिडेंट शिरीष कडू व इतर रोटेरियन व आदिवासी बांधव उपस्थित होते.