एमपीएससीच्या भरतीप्रक्रीयेचा मार्ग मोकळा

मुंबई : शासनाच्या सर्व विभागांमध्ये एकूण किती रिक्त पदं आहेत, त्या रिक्त पदांचा प्रस्ताव संबंधित विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एमपीएससीच्या भरतीप्रक्रीयेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

विशेष बाब म्हणून 4 मे आणि 24 जून 2021 च्या शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट देण्यात आली आहे. पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत आयोगाकडे संबंधित विभागांनी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले.