कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली ः देशात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अधिक प्रयत्न केले जात आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी तिसर्‍या संभाव्य लाटेचा धोका आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी देशात लसीकरण मोहिमेचा वेग वाढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

सध्या भारतात तीन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्याात आली आहे. त्यामुळे नागरिकांना तीन प्रकारच्या लसी दिल्या दाक आहे. यात सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक व्ही लसींचा समावेश आहे. मात्र मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसी अद्याप मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान आता केंद्राकडून लसींच्या किंमती वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लस उत्पादक कंपन्यांनी लसींच्या दरात वाढ केल्याने देशातही लसींची दरवाढ करण्यात आल्याचे म्हटलं आहे.

यापूर्वी जानेवारी ते जुलै या कालावधीसाठी लसींचे दर निश्चित करण्यात आले होते. त्यात ऑगस्टपासून लसींचे नवे दर लागू केले जाणार आहेत. केंद्राने कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीच्या एका डोससाठी अनुक्रमे 200 ते 206 असे दर निश्चित केले होते. या दरात प्रत्येक राज्य सरकारला लस उपलब्ध करुन दिल्या जात होत्या. मात्र सरकारसाठी असलेल्या या दरात आता वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन लसी आता अनुक्रमे 205 आणि 215 रुपये किंमतींना उपलब्ध होणार आहे.

यामुळे कोव्हिशिल्ड लसीच्या 10 डोसच्या एका बॉटलसाठी राज्य सरकारला 50 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. तर कोवॅक्सिन लसीच्या 20 डोसच्या बॉडलसाठी 180 अधिकचे 180 रुपये मोजावे लागणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रत्येक राज्य सरकारसाठी नव्या दरासंदर्भात माहिती जाहिर केली आहे. नव्या किंमतींनुसारच आता सरकारला लसींच्या ऑर्डर द्यावी लागणार असल्याचे केंद्रीय मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.