मुंब्रा-पनवेल महामार्गावर टँकर मधून गॅस गळती

मुंब्रा-पनवेल महामार्गावर टँकर मधून गॅस गळती

पनवेल ः तळोजा औद्योगिक वसाहती मधील कारखान्यातून कार्बन डाय ऑक्सिजनची वाहतूक करणार्‍या टँकर मधून गॅस गळती होण्याची घटना गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी गळतीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र यामुळे महामार्गावर काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. 

महामार्गावरील खिडूकपाडा परिसरात ही घटना घडली असून या घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. दरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये या करिता सुरक्षिततेचा उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.