135 घरगुती गॅस वितरण करणार्‍यांचे लसीकरण

नवी मुंबई ः विविध सेवा पुरविताना ज्यांचा नागरिकांशी मोठ्या प्रमाणावर संपर्क येतो अशा कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीच्या पोटँशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींना कोव्हिडपासून संरक्षण लाभावे याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार त्यांचे प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. त्यामध्ये घरगुती गॅस सिलिंडर वितरण करणार्‍या 135 कर्मचार्‍यांचे बुधवारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ व ऐरोली रूग्णालयांत कोव्हीड लसीकरण करण्यात आले.

यामध्ये सार्वजनिक रूग्णालय, वाशी येथे 40, माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय नेरूळ येथे 41 व राजमाता जिजाऊ रूग्णालय ऐरोली येथे 54 घरगुती गॅस सिलिंडर वितरण करणार्‍या कर्मचार्‍यांनी कोव्हीड लस घेतली.