पूरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे कोकणातील चिपळून, महाड मधील अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊन त्या भागातील बहुतांश कुटुबांचे संपुर्ण जीवन उध्वस्त झाले आहे. एक हात मदतीचा या उक्तीप्रमाणे पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत मिळावी यासाठी सीबीडी बेलापूर परिसरातील क्लासिक मित्र मंडळ आणि प्रशांत स्टार मित्र मंडळ यांनी पूरग्रस्तांना एक मदतीचा हात देत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.   

निसर्गरम्य कोकणाला पावसात होत्याचे नव्हते झाले. दरडी कोळल्या, अंगावरचे कपडे सोडून सर्व वाहून गेले, परंतु नेहमी संकटात धावणारा महाराष्ट्र पुन्हा यावेळीही येथील पूरग्रस्ताच्या मदतीला धावून आला. कोकणची भीषण अवस्था पाहता एक हात मदतीचा या भावनेतून सी.बी.डी. बेलापूर मधील नागरिकांनी अन्नधान्य किट, पाण्याच्या बाटल्या, चादर, महिला व लहान मुलीमुलांसाठी कपडे, सॅनिटरी पॅड, सॅनिटायझर, बिस्कीट, साबण, साडया, चहापावडर आदींसह विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पूरग्रस्त भागात जावून वाटप केले.  या उपक्रमाला आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे आणि माजी नगरसेवक डॉ.जयाजी नाथ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच समाजसेविका चैताला ठाकुर, समाजसेवक जयदेव ठाकुर यानी वाहतूक सोयीचे नियोजन करून दिले. तसेच प्रशांत तडाखे, राजेश घाग, भुषण ठाकुर, मिलिंद देशपांडे, सागर लोंढे, राकेश सकपाळ यांचे आथिर्क सहाय्य मिळाले. यावेळी सुबोध मोरे, अजय सिंह, मणी कोनार, राम मेस्त्री, मृणाल मगर आदींसह इतरांनी विशेष मेहनत घेतली.