गजानन काळेंच्या पत्नीचे खळखट्याक

विवाहबाह्य संबंध, शिविगाळीचे पत्नीचे आरोप; गुन्हा दाखल

नवी मुंबई : मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर त्यांच्या पत्नीने विवाहबाह्य संबंध आणि जातीवाचक शिवीगाळीचे आरोप केले आहेत. याप्रकरणी त्यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार छळवणुकीसह इतक कलमामंखाली  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे काळे अडचणीत सापडले आहेत. 

गजानन काळे हे मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष आहेत. त्यांनी बेलापूर विधानसभेची निवडणूकही लढवली होती. गजानन काळे यांचे अनेक स्त्रियांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. याबद्दल त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला मात्र, मी राजकारणी  आहे, मला कुणी काही करु शकत नाही. मला तू आणि मुलगा यांच्यापासून स्पेस हवी आहे         असं म्हणत सातत्याने त्याने मला त्रास दिलाय, असं त्यांच्या पत्नीने पोलिस तक्रारीत म्हटलं आहे. 2008 मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरच्या काहीच दिवसांत आमच्यात भांडण सुरु झालं. सावळा रंग आणि जातीवरुन टोमणे मारुन जातीवाचक शिवीगाळ करुन माहराण करत असत. तुझ्याशी लग्न करुन माझा काही एक फायदा झाला नाही तुझ्या वडिलांची पोस्ट (हुद्दा) बघून मी तुझ्याशी लग्न केलं, असेही गंभीर आरोप गजानन काळे यांच्या पत्नीने त्यांच्यावर केले आहेत. माझ्या मुलाच्या हक्कासाठी मी हा निर्णय घेतला असून हा माझा वैयक्तिक निर्णय असल्याचे संजीवनी काळे यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे मनसेत खळबळ उडाली आहे. 

  • अधिकारी, कंत्राटदारांना धमकावून वसुली
  • नवी मुंबई महापालिकेचे विभाग अधिकारी, कंत्राटदार यांना धमकावून त्यांच्याकडून लाखो रुपयांची वसुली शहराध्यक्ष गजानन काळे करत होता. प्रत्येक 2 ते 5 दिवसांनी गजानन काळेच्या घरी अनेक अधिकारी कंत्राटदार स्वतः किंवा त्यांच्या माणसांना पाठवून 2 ते 3 लाख रुपये देत होते असा दावा संजीवनी काळे यांनी केला. 
  • कुठलाही व्यवसाय नसताना केवळ इस्टेट एजंट असल्याचे दाखवत, आज नवी मुंबईत 4 ते 5 घरे, 2 गाड्या आणि लाखोंची रोख रक्कम गजानन काळे यांनी कमावली. हा सगळा काळा पैसा असल्याची टीका संजीवनी काळे यांनी केली.