मंदिरात चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

3 लाख 35 हजारांचा मुद्देमाल हस्तगत ; मध्यवर्ती गुन्हे शाखेची कामगिरी

नवी मुंबई ः नवी मुंबई व पालघर परिसरात मंदिरातील मुर्ती, देवांचे दागिने, वस्तू व दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरी करणार्‍या चार जणांच्या सराईत टोळीला मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 किलो 350 ग्रॅम चांदी व 24 मोटर वाहनांच्या बॅटरी हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदर टोळीकडून सूमारे 3 लाख 35 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

नवी मुंबईतील सीबीडी, खारकोपर, नेरुळ तसेच पालघर परिसरातील मंदिरात घरफोडी होण्याच्या घटनात वाढ झाली होती. सदर मंदिरातून देवांच्या मुर्ती, दागिने, पादुका, चांदिचे मुकुट, रोख रक्कम चोरीस गेल्या होत्या. नागरिकांच्या भावनेशी निगडीत बाब असल्याने हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग व अपर पोलीस आयुक्त डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेने विशेष मोहिम राबवून कौशल्यपुर्ण तपास करुन हे गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एन.बी. कोल्हटकर यांचे मार्गदर्शनाखाली समांतर तपास चालू असताना, सपोनि राजेश गज्जल व पोशि राहुल वाघ यांना मंदिरामध्ये चोरी करणारे सराईत आरोपी येणार असल्याची खात्रिशीर माहिती मिळाल्याने मध्यवर्ती कक्षाचे अधिकारी यांनी सापळा लावून आरोपी सुभाष केवट (35), मगबुल जोमू शेख उर्फ चिरा (38), राजू मारुती वंजारे (30)  यांना शिताफीने ताब्यात घेतले. सदर आरोपी अतिशय सराईत असल्याने त्यांच्याकडे कौशल्यपुर्ण तपास केल्यावर त्यांनी पाससिकहिल,          (पान 7 वर)

सीबीडी बेलापुर येथील राधा गिरीधारी मंदिरातील मुर्तीचे चांदिचा मुकूट व दानपेटी फोडून रोख रक्कम चोरी केल्याची कबूली दिली. पुढील तपासात आरोपींनी चोरी केलेले चांदीचे मुकूट वितळुन देणारा इसम आसित कालीपदो दास (45) यासही अटक केली. सदर सराईत आरोपींनी खारकोपर येथील विठ्ठल रुखमाई मंदिरातून मुर्तीचे सोन्याचे दागिने व चांदिच्या पादुका, नेरुळ येथील बालाजी मंदिरातून दानपेटीतील रोख रक्कम, चिंतामणी पार्श्‍वनाथ दिंगबर जैन मंदिर पालघर येथून मुर्ती चोरी केल्याप्रकरणातील वेगवेगळे गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर गुन्ह्यातील चोरी केलेले देवदेवतांचे चांदिचे मुकूट, पादुका इत्यादी असे सुमारे 2 किलो 350 गॅ्रम वजनाची चांदी हस्तगत करण्यात आली आहे. तसेच अधिक तपासात नमुद आरोपी व त्यांचे साथीदारांनी नवी मुंबई परिसरातून पार्क केलेल्या वाहनांच्या 24 बॅटरी हस्तगत करण्यात आलेला आहे. सरद आरोपींकडून सूमारे 3,35000 रुपये किमंतीचा मुदद्ेमाल जप्त करण्यात आला आहे.