सिडकोची बंपर सोडत

नवी मुंबईत 200 हून अधिक भूखंड विक्रीसाठी उपलब्ध

नवी मुंबई ः पनवेल व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी नवी मुंबईतील उपलब्ध सर्व भूखंडांच्या विक्रीचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सिडकोने पनवेल आणि नवी मुंबई महापालिका हद्दीतील सूमारे 244 भूखंड विक्रिची बंपर सोडत जाहीर केली आहे. त्यामुळे घरांचे स्वप्न पाहणार्‍या सर्वसामान्यांपासून ते विकसकांना सदनिका बांधण्यासाठी मोठे क्षेत्र उपलब्ध झाल्याने नवी मुंबईकरांत उत्साहाचे वातावरण आहे. 

नवी मुंबईत विकासासाठी क्षेत्र कमी असल्याने सदनिकांचे भाव गगनाला भिडले आहेत. गेले अनेक महिने विकासासाठी भूखंड विक्री करावी अशी मागणी विकासक संघटना सिडकोकडे करत होती. त्यातच नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महापालिका यांनी आपला विकास आराखडा बनविण्याचा इरादा जाहीर केला आहे. त्यातच नवी मुंबई महानगरपालिकेने सिडकोच्या 324 भूखंडावर भविष्यातील लोकसंख्येच्या गरजेच्या प्रमाणात आरक्षणे टाकल्याने सिडको आणि नवी मुंबई महापालिका यांच्यातील वाद सध्या मंत्रालयाच्या मध्यस्थीने सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक असल्याने त्यांच्यावर मंत्रालयातून दबाव टाकून आरक्षणे हटविण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या सिडकोकडून सुरु आहे. पनवेल महानगरपालिकेचा विकास आराखडा प्रगतीपथावर असल्याने आरक्षणाबाबत सध्या वाद उद्भवलेला नाही. 

सिडकोचे सहा हजार कोटीहून अधिक मोकळे भुखंड विक्रीसाठी उपलब्ध असून त्यावर संबंधित नियोजन प्राधिकरणांनी आरक्षण टाकण्याअगोदर त्यांची विल्हेवाट लावण्याचा सिडकोचा मानस आहे. शासनही अप्रत्यक्षपणे सिडकोला याबाबत सहकार्य करत असून नवी मुंबई महानगरपालिकेला त्यांचा विकास आराखडा प्रसिद्ध करण्याचा मुदतवाढीचा प्रस्ताव जाणिवपुर्वक प्रलंबित ठेवला आहे. दोन्हीही नियोजन प्राधिकरणांचे विकास आरखडे प्रसिद्ध होण्यापुर्वी उपलब्ध भुखंड विकून हजारो कोटी रुपये गोळा करुन सिडकोला आपले हात वर करायचे आहेत. त्याअनुषंगाने सिडकोने पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, सीबीडी बेलापुर, नेरुळ, कोपरखैरणे येथे 1500 चौ. मीटर ते 5500 चौ. मी. क्षेत्राचे 45 भूखंड विक्रीस काढले असून यातून सिडकोला 1500 कोटी रुपये मिळण्याची आशा आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांसाठी सिडकोने 50 चौ.मी. पासून 400 चौ. मी. पर्यंत 182 भुखंडांच्या विक्रिची बम्पर जाहीरात काढली आहे. ही सोडत ऑनलाईन बोलीपद्धतीने होणार असून प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार भाव द्यायचा आहे. कोट्यावधी रुपयांची अनामत रक्कम सिडकोने आकारली असून 43 हजार प्रति. चौ. पासून 1 लाख 65 हजार रुपये प्रति चौ.मी. चा आधारभुत भाव निश्‍चित केला आहे. सिडकोच्या या बम्पर सोडतीचे नवी मुंबईकरांनी स्वागत केले असून सर्वसामान्यांपासून ते विकसकांपर्यंत सदनिका बांधण्यासाठी भूखंड नवी मुंबईतील निरनिराळ्या क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत. 

  • 1500 कोटी रुपये वसूलीचे लक्ष
   45 भूखंडांच्या विक्रीतून सिडकोने 1500 कोटी रुपये वसूलीचे लक्ष ठेवले आहे. पनवेल आणि नवी मुंबई महानगरपालिका त्यांचे प्रस्तावित विकास आराखडे प्रसिद्ध करण्याअगोदर दोन्ही नियोजन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील सर्व भूखंड विकण्याचा मानस आहे. सिडकोला हे भूखंड विकणे सोपे जावे म्हणून नवी मुंबई महापालिकेची विकास आराखडा प्रसिद्ध करण्याची वाढीव मुदत शासनाकडून प्रलंबित 

   • 16 भूखंड भाडेपट्ट्यावर 
    नवी मुंबईतील खारघर, कळंबोली, नवीन पनवेल (पू.) आणि नवीन पनवेल (प.) नोडमधील निवासी, निवासी तथा वाणिज्यिक वापराचे एकूण 16 भूखंड भाडेपट्ट्यावर उपलब्ध 
    तर दुसर्‍या योजनेंतर्गत 8 भूखंड हे इंधन भरणा केंद्र (पेट्रोल पंप/सीएनजी स्टेशन) वापराकरिता भाडेपट्ट्याने उपलब्ध