नाखवा सीताराम भगत मंडळाच्यावतीने आरोग्य उत्सव

मुंबई ः सोनखार सानपाडा-पाम बीच क्षेत्रातील सार्वजनिक व सांस्कृतिक उत्सवाच्या आयोजनातून सामाजिक बांधिलकी आणि एकता जपणारे प्रथम मंडळ म्हणून ख्याती असणार्‍या नाखवा सीताराम भगत मंडळाच्यावतीने यंदा 25 व्या रौप्य महोत्सवी वर्ष निमित्त आरोग्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 28 ते 31 ऑगस्ट या कालावधीत ही विविध आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

यंदा नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या 25 व्या रौप्य महोत्सवी वर्षातील सार्वजनिक गोकुळ अष्टमी, श्री गणेशोत्सव व नवरात्री हे तिन्ही उत्सव निव्वळ धार्मिक उत्सव म्हणून साजरे न करता या उत्सवांच्या आयोजनातून सोनखार - सानपाडा पाम बीच विभागातील सेक्टर 1, 13, 14, 15, 16 16ए, 17, 18, 19, जुईनगर सेक्टर 22, 23 आणि  वाशी गाव सेक्टर 30, 30अ मधील रहिवासीय व नव्या मुंबईसह, मुंबई, ठाणे आणि रायगड या परिसरातून येणार्‍या भाविक भक्तांसमोर पुन्हा एकदा एक नवा सामाजिक आशय असलेला संदेश देणार आहेत. गेल्या 24 वर्षांपासून आपले मंडळ हे उत्सव साजरे करीत असताना आपल्या मंडळासाठी सोनखार वासियांनी केलेले अनमोल सहकार्य, कार्यकर्त्यांची अहोरात्र मेहनत, सर्व देणगीदार, व्यापारी बांधव आणि हितचिंतक यांच्या भरीव सहयोगामुळे संपूर्ण नवी मुंबईतील नामांकित सामाजिक उपक्रम राबिवणार्‍या मंडळामध्ये सोनखारच्या राजाचे स्थान मिळालेले आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे वेळोवेळी पारितोषिक ही प्रदान करण्यात आलेला आहेत. आरोग्य उत्सव अंतर्गत विविध आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि आपल्या विभागातील सर्व नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी स्वस्त दरात लसीकरण (कोविशील्ड) शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना ह्या वर्षी वर्गणीसाठी आवाहान न करता त्यांच्या परिवारातील सदस्यांचे आरोग्य सुरक्षित करण्याकरिता सदर मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन करीत आहे. या शिबिरांचे आयोजन बुद्धेश्वर मंदिर सानपाडा सेक्टर 14 येथे करण्यात येणार आहे.

 • 28 ऑगस्ट 2021 2021
  वेळ  सकाळी 9.00 ते 2.00
  1. स्वस्त दरात लसीकरण शिबीर - प्रभागातील नागरिकांना कोरोना पासून सुरक्षित ठेवण्याकरिता मंडळाच्या वतीने 400/ रुपय भरून त्यांस 380/ दरात लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 • 29 ऑगस्ट 2021
  वेळ - सकाळी 9.00 ते 2.00
  2. रक्तदान शिबीर - टाटा मेमोरियल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
 • 12 सप्टेंबर 
  वेळ - सकाळी 9 .00 ते 2.00
  3. मोफत कोरोना चाचणी शिबीर - पालिकेच्या सहकार्याने विभागातील नागरिकांसाठी कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
 • 18 सप्टेंबर 2021
  वेळ - सकाळी 9.00 ते 2.00
  4. मोफत आरोग्य तपासणी शिबीर  
 • 18 सप्टेंबर 2021
  वेळ - सकाळी 9.00 ते 2.00
  5. मोफत नेत्र तपासणी शिबीर