महापलिका शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मागणीला यश

नवी मुंबई ः नवी मुंबईतील सर्व सामान्य नागरिकांना शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढ देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पालिका उपायुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे. सदर मागणीनुसार आयुक्तांनी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. 

31 ऑगस्ट 2021 पर्यंतच नागरिकांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची मुदत महापालिकेने नवी मुंबईकरांना दिलेली होती. परंतु गेल्या दिवसांपासून सर्व सामान्य नागरिकांना कोविड कालावधी आणि लॉकडाऊनच्या परिणामामुळे उत्पन्नाचे दाखले मिळवण्यासाठी उशीर होत आहे. नवी मुंबईतील ई-सेवा केंद्राची संख्या सुद्धा कमी झालेली असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे यांनी उपायुक्त क्रांति पाटील समाजकल्याण विभाग यांच्या लक्षात आणून दिली. त्याचबरोबर जे लाभार्थी विद्यार्थी आहेत ते फक्त शिष्यवृत्तीला आवश्यक असणारे कागदपत्रे जमा करु शकले नसल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना या महापालिका शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळावा व एकही विद्यार्थी यापासून वंचित राहता कामा नये यासाठी नवी मुंबईकर विद्यार्थी पालकांना एक महिन्याची मुदत वाढ मिळावी अशी मागणी डोंगरे यांनी केली. त्यानुसार एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, उपशहर अध्यक्ष निखील गावडे, दशरथ सुरवसे, समृद्ध भोपी, अमर पाटील, अक्षय वाघुले उपस्थित होते.