मंत्रालयातून चालणारा पालिकेचा कारभार थांबवा-आ. नाईक

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेतील काही अधिकारी हे मंत्रालयातील मंत्र्यांचे आदेश पाळून पालिकेच कारभार मनमानी पद्धतीने करीत असल्याचा आरोप करुन कारभार सुधारा व चुकीची कामे करु नका अन्यथा भविष्यात याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी पालिका अधिकार्‍यांना दिला आहे. कोरोना नियंत्रण व अन्य महत्वाच्या 

विषयांवर नाईक यांनी गुरुवारी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या प्रकरणी आयुक्तांनी गंभीर लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली. 

आयुक्त चांगले काम करीत आहेत मात्र त्यांच्या हाताखालचे लोक कामात सुस्तपणा करत आहेत. मंत्रालयातून सांगितल्यावरच नागरी कामांचे कार्यादेश काढले जात आहेत. ठराविक लोकांना कामे दिली जात असून अन्य लोकांना दिलेली कामे काढून घेतली जात आहेत. त्यामुळे मंत्रालयातून चालणारा कारभार थांबवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आ. नाईक यांनी दिला. 

  • नवी मुंबईकांना वंचित ठेवून इतरांना मदत
    पालिका प्रशासनाने पहिल्या लाटेत विकत घेतलेले 456 रेमडेसवीर इंजेक्शन नवी मुंबईकरांना गरज असताना ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर महापालिकांना पुरविले. इतर महापालिकांन ामदत केली पाहिलेजे. मात्र नवी मुंबईकरांना वचित न ठेवता मदत केली पाहिजे. नवी मुंबईकरांना प्राधान्य न देता अन्य ठिकाणी ही अंजेक्शन उपलब्ध करुन देणारे अधिकारी कोण आहेत आणि त्यांचा करविता धनी कोण याची चौैकशी करण्याची मालणी त्यांनी आयुक्तांकडे केली. 
     कोरोनाचा कहर कमी होत नाही तोपर्यंत पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी सर्व सोयी उपलब्ध कराव्यात. शिक्षकांनाही चांगल्या प्रकारे शिकवता यावे यासाठी त्यांच्यावरील अतिरिक्त कामाचा बोजा कमी करण्याची मागणीही नाईक यांनी केली. त्यावर कार्यावाही सुरु असल्याचे बांगर यांनी सांगितले.