फळांची मागणी वाढली

नवी मुंबई : श्रावण महिन्यांत भाजीपाला व फळांना मोठी मागणी असते. सध्या पावसाळी आजार सुरु असून रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी फळांची मागणी वाढली आहे. परिणामी फळांचे बाजारभाव गगनाला भिडतात. परंतू यावर्षी मात्र फळांचे बाजारभाव ग्राहकांच्या आवाक्यात राहिल्याचे पाहायला मिळत आहे. 

कोरोना काळ अल्यामुळे नागरिक रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे साधा आणि घरचा आहार घेण्याला लोक प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय भाज्या आणि फलोहाराला पसंती दिली जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी फळांना चांगलीच मागणी असते. श्रावण महिन्यात अनेक लोक शाकाहाराला पसंती देतात. शिवाय या महिन्यात रक्षाबंधन, कृष्णजन्माष्टमी असे उत्सव येतात. त्यामुळे बहुतेक लोकांचा उपवास असतो. त्यामुळे फळांची मागणी वाढते, परिणामी किंमतीची वधारतात. मात्र यंदा मागणी असूनही पळांचे बाजारभाव आवाक्यात आहेत. सोमवारी मार्केटमध्ये 250 गाड्यांची आवक झाली. डेंग्यू आजारामुळे ड्रॅगन फळाला चांगली मागणी असते. या फळाचा दर 25 ते 30 प्रतिनग असा आहे. शिवाय किवी, पपई, मोसंबी, सफरचंद आणि सीताफळाची आवकही वाढली आहे. श्रावणामुळेही ग्राहकांकडून फळांना पसंती दिली जात आहे. सफरचंदचा हंगाम जोमात असून आवक वाढल्याने त्याची किंमत प्रती किलो 80 ते 100 वरून 60 ते 80 रुपयांवर आली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून डेंग्यू आणि मलेरियाचे संशयित रुग्ण आढळू लागले आहेत. या आजारात रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे डॉक्टर किवी, ड्रॅगन फ्रूट आणि पपई खाण्याचा सल्ला देत असतात. त्यामुळे या फळांना मागणी वाढली असल्याचं व्यापार्‍यांनी सांगितलं.

मुंबई एपीएमसी मार्केटमधील फळांचे बाजारभाव
ड्रॅगन फ्रूट - 25 ते 30 रुपये प्रती नग
किवी - 10 रुपये प्रती नग
पपई - 20 रुपये प्रति नग
सफरचंद - 60 ते 80 रु. प्रति किलो
डाळिंब - 50 ते 120 रु. प्रति किलो
पेर - 50 ते 100 रुपये किलो