पूरग्रस्तांसाठी सिडको अधिकारी-कर्मचार्‍यांचे एक दिवसाचे वेतन

सिडको एम्प्लॉईज युनियने केला 27 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्याकडे सुपूर्द 

नवी मुंबई : सिडकोतील अधिकारी-कर्मचार्‍यांनी कोकणासह राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक दिवसाच्या वेतनाची 27 लाख रुपयांची रक्कम दिली आहे. सिडको एम्पलॉईज युनियनच्या पदाधिकाऱयांनी 27 लाख रुपयांचा हा धनादेश सोमवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.  

सिडको एम्फ्लॉईज युनियनने सिडको अधिकारी व कर्मचाऱयांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी देखील जपण्यात प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिडको एम्फ्लॉइज युनिनयने कोकणातील पुरपरिस्थीतीमुळे संसार उध्वस्त झालेल्या चिपळुण येथील पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनाश्यक वस्तुचे वाटप केले होते. त्यानंतर कोकणासह राज्यात विविध ठिकाणी झालेल्या पुरग्रस्त झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सिडकोचे अधिकारी, कर्मचारी, अभियंता यांनी आपले एक दिवसाचे वेतन द्यावे, असे अहवान सिडको एम्फ्लॉईज युनियतर्फे करण्यात आले होते.  

सिडको एम्फ्लॉइज युनियच्या आवाहनाला प्रतिसाद देत सिडकोतील अधिकारी कर्मचाऱयांनी आपले एक दिवसाचे वेतन पुरग्रस्तांसाठी दिले आहे. या एक दिवसाच्या वेतनातून जमा झालेल्या 27 लाख 59 हजार 243 रुपयांचा धनादेश सोमवारी युनियनचे अध्यक्ष निलेश तांडेल यांच्यासह युनियनचे सरचिटणीस जे. टी. पाटील, उपाध्यक्ष विनोद पाटील, महादेवबुवा शहाबाजकर आणि सल्लागार बबन पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.