Breaking News
मुंबई : महावितरणच्या भरारी पथकाने पनवेल शहर विभागातील उरण येथे एका आईस अँड चिलिंग कंपनीत 1,36,341 युनिटची 20 लाख 60 हजार 220 रुपयांची वीजचोरी उघडकीस केली आहे. या प्रकरणी उरण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आले असून भरारी पथकाच्या या कारवाईमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत.
दि. 23 ऑगस्ट 2021 रोजी महावितरण वाशीच्या भरारी पथकाने मुख्यालयातील सुरक्षा व अंमलबजावणी विभागच्या व मुख्य अभियंता भांडूप परिमंडल सुरेश गणेशकर यांच्या निर्देशानुसार उरण येथील एका आईस अँड चिलिंग या बर्फ बनविण्याचा कंपनीत वाशीच्या भरारी पथकाने धाड टाकली व वीज मीटरची तपासणी केली. मीटरची सविस्तर तपासणी केली असता मीटरमध्ये काही फेरफार केले असल्याचे आढळून आले. या कंपनीला महावितरणने 65 एचपीचा विद्युत भार मंजूर करून दिला होता. परंतु, सदर मीटरची अक्युचेकद्वारे तपासणी केली असता मीटर मंदगतीने चालत असल्याचे निदर्शनास आले. मीटर उघडल्यावर, रिमोट सर्किटच्या सहाय्याने वीजचोरी केली आहे असे निष्पन्न झाले. रिमोटद्वारे ग्राहक मीटरमध्ये वापरात असलेल्या विजेचे व्यवस्थित मापन होऊ देत नसल्याचे उघड झाले. फेरफार करून ग्राहकाने 1,36,341 ऊनिटची रु. 20,60,220 वीजचोरी केली आहे असे आढळून आले. ग्राहकाला वापरलेल्या विजेचे देयक सोबत दंडाची रक्कम असे एकूण बिलाची आकारणी करून देण्यात आले होते. ग्राहकाने ही रक्कम न भरल्यामुळे सदर ग्राहका विरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीजचोरी करणे एक गुन्हा आहे. ग्राहकांनी अधिकृतपणे विजेचा वापस करावा अन्यथा कठोर कारवाईच्या सामोरे जावे लागतील असे आवाहन महावितरणने सर्व ग्राहकांना केले आहे. सदर वीजचोरी पकडण्यात सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक कमांडर शिवाजी इंदलकर, उपसंचालक कोंकण प्रादेशिक विभाग,सुमित कुमार, कार्यकारी अभियंता, मनोज अप्पा त्रिम्बके यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने विशेष मेहनत घेतली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai