खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


सत्तेच्या व्यसनाचे उच्चाटन गरजेचे- उद्धव ठाकरे

दसरा मेळाव्यात भाजपच्या सत्तालालसेवर टिका 

मुंबई : दसर्‍याच्या निमित्ताने शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा यंदा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या मेळाव्यात सत्तास्थापनेसाठी केंद्र सरकार ईडी, सीबीआय आणि एनसीबी सारख्या सरकारी यंत्रणेचा करत असलेल्या दुरुपयोगावर टिका करताना सत्तेच्या व्यसनाला देशातून उच्चाटन करणे गरजेचे असल्याचे घणघात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला. तासभर चाललेल्या या मेळाव्यात त्यांनी चौफेर टोलेबाजी करत भाजपला आणि त्यांच्या बेगडी हिंदुत्वाला चांगलेच धारेवर धरले. हे करत असताना त्यांनी भविष्यात महाराष्ट्र सरकार कोणकोणते महत्वाचे प्रकल्प राज्यात राबवणार आहे याची जंत्री त्यांनी मेळाव्यात दिली. 

भाषणातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे 

1. चिनमधील कंपन्या महाराष्ट्रात 
कोरोना संक्रमणाच्या काळात चीन मधून बाहेर पडत असणार्‍या कंपन्या महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकारने रोड मॅप तयार केला असून त्या दृष्टीने नुकतेच एक प्रेझेंटेशन देण्यात आले आहे. यामुळे रोजगारासह परकीय गुंतवणुकीची मोठी संधी राज्यात निर्माण होणार आहे. 
2. मुख्यमंत्री घरातला वाटला पाहिजे
मी राज्याचा मुख्यमंत्री आहे असं कधीच मला वाटू नये. माझ्या जनतेलाही तसं वाटू नये. कारण त्यांना मी त्यांच्या घरातला वाटलो पाहिजे. जे मी पुन्हा येईन पुन्हा येईन बोलत होते आता ते मी गेलोच नाही असं वाटते असे म्हणणार्‍यांना ‘आता तुम्ही बसा तिकडेच’ असा खणखणीत टोला हाणला. 
3. हिम्मत असेल तर सरकार पाडा
ईडी,सीबीआयच्या माध्यमातून आव्हान न देता हिंमत असेल तर समोरुन लढा द्या. आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचे हे मर्दाचे लक्षण नाही. सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. तसं करून पडत नाही म्हणून छापा-काटा सुरु झाला. छापा टाकायचा आणि काटा काढायचा. ही थेरं जास्त काळ चालू शकणार नाहीत. 
4. भाजपकडे उमेदवार नाहीत
भाजप देशातील नव्हे, तर जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करतं. पण यांच्याकडे पोटनिवडणुकीसाठी देखील उमेदवार नाहीत. यांना  इथले तिथले उपरे उमेदवार शोधावे लागतात. भाजपा म्हणजे नुसती प्लॅटफॉर्मवरची गर्दी आहे. 
5. बाबरी पाडली तेव्हा हे बिळात लपले
हिंदुत्वाला जेव्हा धोका होता तिथे केवळ बाळासाहेब उभे राहिले होते. धमक्या आल्या.. पण कोणात ना धमक होती.. ना हिंमत होती. मुंबई पेटली, तेव्हा शिवसेना रस्त्यावर उतरली होती. बाबरी पाडली तेव्हा हे लोक बिळात होते. तेव्हा शेपट्या घातल्या होत्या.. तेव्हा बाळासाहेब ठाकरे उभे होते.. मुंबई आम्ही वाचवली होती.
6. घटनेचे अवमुल्यन झाले तर दुर्घटना होईल
केंद्राएवढीच सर्व राज्यं सार्वभौम आहेत आणि राहतील, असं बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलं होतं. राज्याला केंद्राच्या बरोबरीचे हक्क दिलेले आहेत. फक्त तीन अधिकार केंद्राला जास्त दिले आहेत. तसं होत नसेल तर घटनेची दुर्घटना होईल.
7. विरोधकांचे पुर्वज वेगळे आहेत का?
दसरा मेळाव्यात संघप्रमुख मोहन भागवत यांनी सर्वच भारतीयांचे पुर्वज एकच असल्याचे विधान केले. या विधानाचा समाचार घेत त्यांनी हे जर खरे असेल तर ज्या पद्धतीने भाजप विरोधकांशी वागत आहे त्यामुळे विरोधकांचे पुर्वज वेगळे आहेत काय? हा प्रश्‍न विचारुन त्यंानी भागवत यांच्या दाव्यातील पोकळपणा उघड केला. 
8. मुंबईतील प्रकल्प
मुंबईत मराठी भाषा भवन, मराठी रंगभुमी दालन, वरळी येथे जागतिक दर्जाचे मत्स्यालय, तसेच धारावीच्या पुनर्विकासाबरोबर जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र उभारण्याचे जाहीर करुन मोदींच्या गुजरातमधील आर्थिक केंद्राची हवा काढली. त्याचबरोबर मुंबईत लष्कराचे मोठे संग्रालय उभारण्याचा मनोद्य जाहीर केला. 
9. कोरोनाशी लढा लोकांच्या पैशावर
केंद्र सरकारने राज्याला कोरोना महामारीत भरीव आर्थिक मदत न दिल्याने राज्याने जनतेने दिलेल्या कराच्या पैशातूनच कोरोनाशी दोन हात केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे फडणवीस आणि त्यांच्या साथीदारांच्या दाव्यातील हवा काढली. 


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट