खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


भुक्ते आणि चौधरी यांना आरोपी करण्याची मागणी

अधिकार्‍यांच्या बचावासाठी बनवला खोटा अहवाल   

नवी मुंबई ः बांधकाम परवानग्या देताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप असलेल्या माजी आयुक्त रामास्वामी एन. यांना वाचविण्यासाठी तत्कालीन सह संचालक प्रकाश भुक्ते आणि अवर सचिव निर्मलकुमार चौधरी यांनी चुकीचा अहवाल बनवल्याची बाब माहिती अधिकारात समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी याबाबत नगरविकास प्रधानसचिव भुषण गगराणी यांच्याकडे तक्रार केली असून सीबीडी येथील फौजदारी खटल्यात दोघांना सह आरोपी बनविण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये परवानगी मागितली आहे. गगराणी याबाबत कोणता निर्णय घेतात याकडे आता संबंधित अधिकार्‍यांचे लक्ष लागले आहे. 

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी एन.रामास्वामी यांनी नवी मुंबई महानगरपालिकेत आयुक्तपदी कार्यरत असताना आपले सहकारी सहसंचालक ओवैस मोमिन व नगररचनाकार सतीश उगीले यांना हाताशी धरुन अनेक प्रकरणात चुकीच्या व नियमबाह्य पद्धतीने बांधकाम परवानग्या दिल्याचा आरोप सुर्वे यांनी केला होता. याबाबत सुर्वे यांनी सीबीडी येथील न्यायालयात घणसोली येथील सेक्टर 11 मधील भुखंड क्र. 5 ला अवैधरितेने बांधकाम परवानगी दिल्याने फौजदारी खटला दाखला केला आहे. रामास्वामी हे आयएएस असल्याने त्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अतिरिक्त मुख्यसचिव (सेवा) यांच्याकडे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 197 अन्वये गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली असता नगरविकास विभागाकडून यावर अहवाल मागविण्यात आला होता. 

सहसंचालक नगररचना ठाणे यांनी याबाबत सविस्तर अहवाल सहसंचालक नगररचना कोकण भवन यांच्याकडे सादर करुन शासनाकडून याबाबत खुलासा करण्याची सूचना केली होती. भुक्ते यांनी यापुर्वी मुंबई उच्च न्यायालयात सुर्वे यांच्या आरोपांच्या समर्थनार्थ दोन शपथपत्रे सादर केली असून यावेळी मात्र त्यांनी रामास्वामी यांना वाचविण्यासाठी स्पष्ट अहवाल न देता शासनाची जाणीवपुर्वक दिशाभूल करणारा अहवाल दिला आहे. या अहवालाचा आधार घेत अवर सचिव निर्मलकुमार चौधरी यांनी तक्रार आणि सादर केलेला अहवाल हा नियमांची सुसंगत आहे की नाही याची खातरजमा न करता रामास्वामी यांना वाचविण्यासाठी खोटा अहवाल सादर केल्याचा आरोप सुर्वे यांनी केला आहे. रामास्वामी, मोमिन व उगीले यांच्या बेकायदेशीर व नियमबाह्य कामामुळे शेकडो ग्राहकांची फसवणुक झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असून शासन याबाबत निर्णय घेण्यास दिरंगाई करत असल्याचा आरोप सुर्वे यांनी केला आहे. दरम्यान, खोटा अहवाल बनवणार्‍या प्रकाश भुक्ते व निर्मलकुमार चौधरी यांनाही सदर फौजदारी याचिकेत सहआरोपी बनवण्यासाठी परवानगीची मागणी सुर्वे यांनी प्रधानसचिव गगराणी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे गगराणी याबाबत कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

रिपोर्टर

संबंधित पोस्ट