खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


मेट्रो मार्ग क्र. 1 ला वेगाचे अंतरिम प्रमाणपत्र प्रदान

प्रवासी वाहतूक सुरू होण्याच्या दिशेने गाठला मोठा टप्पा

नवी मुंबई ः सिडको महामंडळाच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. 1 करीता रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनकडून (आरडीएसओ) वेगाचे अंतरिम प्रमाणपत्र 20 ऑक्टोबर 2021 रोजी देण्यात आले. मेट्रोचे कमाल वेगाने परिचालन करण्याची मंजुरी या प्रमाणपत्राद्वारे देण्यात आली आहे. यामुळे लवकरच या मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

सिडकोकडून नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 4 उन्नत (एलिव्हेटेड) मार्ग साकारण्यात येत आहेत. यातील बेलापूर ते पेंधर हा मार्ग क्र. 1 एकूण 11 कि.मी. लांबीचा असून या मार्गावर तळोजा येथे मेट्रोचे आगार आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत असणार्‍या आरडीएसओ यांच्याकडून देशातील विविध रेल्वे प्रणालींमध्ये प्रमाणीकरण आणि समन्वय साधण्याची जबाबदारी असते. आरडीएसओ यांच्याकडून सदर मार्ग क्र. 1 वरील पेंधर स्थानक ते सेंट्रल पार्क स्थानका दरम्यानच्या 5.14 कि.मी. च्या अंतरावर मेट्रोची ऑसिलेशन चाचणी आणि इनर्जन्सी ब्रेक डिस्टन्स चाचणी 28 ऑगस्ट 2021 पासून घेण्यास सुरुवात झाली. प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी म्हणून ऑसिलेशन चाचणी अत्यंत महत्त्वाची ठरते. 

या दरम्यान वेगवेगळ्या वजनाचा भार वाहून नेण्याची मेट्रोची क्षमता आणि इमर्जन्सी ब्रेक यांची चाचणी घेण्यात आली. तसेच सिडकोकडून रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग, विद्युत पुरवठा, मार्गिका इ. मेट्रोतील प्रणालींशी संबंधित कागदपत्रे, चाचणी प्रमाणपत्रे आरडीएसओला सादर करण्यात येऊन, कागदपत्रांची आरडीएसओकडून पडताळणी करण्यात आली. ऑसिलेशन चाचणी यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर मार्ग क्र. 1 वर कमाल वेगाने मेट्रोचे परिचालन करण्याकरिता आरडीएसओकडून वेगाचे अंतरिम प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यानंतर लवकरच आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून परीक्षण करण्यात येईल व तद्नंतर रेल्वे मंडळाची मंजुरी प्राप्त करून मार्ग क्र. 1 वर पेंधर ते सेंट्रल पार्क स्थानकांदरम्यान प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीला सुरुवात होईल.

मेट्रो मार्ग क्र. 1 वर घेण्यात येणारी ऑसिलेशन चाचणी यशस्वी ठरली असून, आरडीएसओकडून या मार्गावर धावणार्‍या मेट्रोचे कमाल वेगाने परिचालन करण्या संदर्भातील अंतरिम प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. यामुळे प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दिशेने मोठा टप्पा गाठण्यात आला आहे. आता प्रवासी वाहतूक कार्यान्वित करण्यासाठी सीसीआरएस मंजूरीची प्रतिक्षा आहे. -डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट