खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


सिडकोच्या ‘वसूली’ला गणेश नाईकांचा विरोध

घरांच्या किंमती वाढवल्याने आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांची लॉटरी लागलेल्या लाभार्थ्यांना सिडकोने दोन ते चार लाख रुपयांचे नवीन वाढीव दराचे वाटपपत्र दिले आहे. सिडकोच्या या वसूलीला माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांनी विरोध केला असून सिडकोने ही वसूली तत्काळ थांबवली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे. नाईकांच्या या इशार्‍यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

सिडकोच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवी मुंबईत 14,900 घरांचा महागृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येत आहे. 2018-19 साली काढलेल्या सोडतीतील सूमारे 9 हजार लाभार्थ्यांना इरादापत्र देण्यात आली होती. ही घरे आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांसाठी राखीव असून त्यांना अनुक्रमे 25 चौ.मी. व 31 चौ. मी क्षेत्रफळाची घरे अनुक्रमे 18 लाख व 25 लाखांना वाटप करण्यात येणार होती. मार्च 2020 पासून कोव्हिडच्या आक्रमणामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे सरकारी यंत्रणांसह सर्व क्षेत्रातील बांधकामांना त्याचा फटका बसला होता. आजही कोव्हिड काळात गेलेले मजूर अजून परत न आल्याने म्हणावी तशी गती बांधकाम क्षेत्राला मिळालेली नाही. 

जे लाभार्थी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करण्यास अपयशी ठरले त्यांचे इरादापत्र रद्द करुन प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांना इरादा पत्रे वाटून त्यांना आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करण्यास सांगण्यात आली होती. दरम्यान, देशाला पुन्हा कोव्हिडच्या दुसर्‍या लाटेने ग्रासल्याने डिसेंबर 2020 पासून पुन्हा मर्यादित स्वरुपाचा लॉकडाऊन लावण्यात आला होता. शासनाने सरकारी विभागातही कर्मचार्‍यांची उपस्थिती 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवली होती. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी वेळेवर कागदपत्र सादर करुनही सिडकोला विहित वेळेत त्यांची पडताळणी करुन लाभार्थ्यांना वाटपपत्र देण्यात विलंब झाला. दरम्यानच्या काळात, देशात डिझेल, लोखंड आणि सिमेंट यांच्या किमंती वाढल्यामुळे बांधकाम खर्चातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सिडकोला निविदेतील अटी शर्तीप्रमाणे वाढीव बांधकाम खर्च आरबीआय इंडेक्सप्रमाणे ठेकेदारांना देणे बंधनकारक आहे. त्यासाठी सिडकोने नव्याने इरादापत्र दिलेल्या लाभार्थ्यांकडून ही रक्कम वसूल करण्यासाठी वाढीव दराने वाटपपत्र दिल्याची चर्चा सिडकोत आहे. 

अल्प उत्पन्न आणि कमी उत्पन्न घटकांसाठी ही घरे बांधण्यात येत असल्याने वाढीव रक्कमेचा भुर्दंड भरण्याची आपली ऐपत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी माजी मंत्री व ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्याशी संपर्क साधला असून आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. ज्या लाभार्थ्यांना वाढीव रक्कमेचे वाटपपत्र देण्यात आले आहे त्यांनी एकत्र यावे असे आवाहन केले असून आपण त्याबाबत लवकरच सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांच्याशी बैठक आयोजित करु असे सांगितले. नाईकांच्या या आधारामुळे लाभार्थ्यांना धीर मिळाला असून अनेकांनी याबाबत सिडको सकारात्मक भुमिका घेऊन आम्हाला न्याय देईल अशी आशा व्यक्त केली आहे. 

गरिबांना न्याय मिळून देणार
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोने वाटप केलेली घरे ही आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी आहेत. 2022 पर्यंत सर्वांना घरे मिळणे हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे. भाववाढीच्या माध्यमातून गरिबांच्या घरांच्या स्वप्नाला जर सिडको सुरुंग लावत असेल तर त्या विरुद्ध जोरदार आंदोलन करण्यात येईल आणि गरिबांना न्याय मिळून देण्यात येईल. - गणेश नाईक, आमदार

  • सिडकोने दोन वर्षात 14 हजार घरांची लॉटरी काढली. यातील  सात हजार घरे विविध कारणांनी रद्द करण्यात आली. त्यांच्या जागी आता तीन हजार प्रतीक्षा यादीवरील लाभार्थींना घरे देण्याचे काम सुरू आहे. 
  •  मात्र ठरलेल्या किमंतीपेक्षा दोन ते चार लाखांनी किमंत वाढवलेले वाटपपत्र हाती आल्याने लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिडकोच्या दिरगांईचा फटका आम्हाला का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

रिपोर्टर

संबंधित पोस्ट