20 जुलैला पहा ''३१ दिवस''

रोल...कॅमेरा...  अॅक्शन... म्हणताना अनेक दिग्दर्शक आपण पाहिले असतील मात्र '३१ दिवस' सिनेमात प्रमुख भूमिका वठवणारा अभिनेता शशांक केतकर देखील आपल्या वेगळ्या अंदाजात हा डायलॉग बोलणार आहे. जिद्दीने आपल्या इच्छांचा, स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या तरुणाची कथा या सिनेमाचा गाभा आहे. फिल्मफिनिटी प्रॉडक्शनचे बी.एस. बाबू निर्मित आणि आशिष भेलकर दिग्दर्शित हा सिनेमा येत्या २० जुलै २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री मयुरी देशमुख आणि रीना अगरवाल यांच्या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. बॉलिवूड टच आणि तोच ग्रँजर घेऊन आशिष भेलकर मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करीत आहेत.