झटपट वजन कमी करण्याच्या टिप्स

लठ्ठपणा ही आजच्या जीनपद्धतीमधील एक मुख्य समस्या बनली आहे. प्रत्येक तिसरा व्यक्ती लठ्ठपणाला सामोरे जातोय. सध्या भारतामध्ये जवळपास 4 कोटी 10 लाख लोकांचे वजन सामान्य वजनापेक्षा जास्त आहे. बहुतांश लोक सुरुवातीला वजन वाढण्याकडे लक्ष देत नाहीत परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी घाम गाळत बसतात.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. काही नैसर्गिक पदार्थ असे आहेत, ज्यांच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहते. तुम्हालाही कमी कष्टामध्ये वजन कमी करण्याची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला काही छोटे-छोटे उपाय सांगत आहोत. हे उपाय केल्यास तुमचे वाढलेले वजन कमी होण्यास निश्चितच मदत होईल.

 जास्त कार्बोहायेड्रेट असणार्‍या पदार्थांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. साखर, बटाटा आणि तांदळामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायेड्रेट असते. यामुळे चरबी वाढते.

 फक्त गव्हाच्या पिठाची पोळी खाण्यापेक्षा गहू, सोयाबीन आणि हरभरे मिश्रित पिठाची पोळी फायदेशीर ठरते.

 दररोज पत्ताकोबीचे ज्यूस घ्यावे. पत्ताकोबीमध्ये चरबी कमी करणारे गुण असतात. यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म योग्य राहते.

लठ्ठ लोकांनी खाऊ नयेत हे 7 पदार्थ

 फ्रुट जूस ः यामध्ये साखर अधिक प्रमाणात असते. ज्यामुळे पोट आणि पार्श्‍वभागाची चरबी वाढते.

 व्हाइट ब्रेड ः यामुळे ब्लड शुगर लेवल वाढते. पोटाची चरबी वाढते.

 चीज ः यामध्ये फॅट्स आणि कॅलरीज जास्त असतात. यामुळे पोट वाढते.

 हाय फॅट्स दुध ः यामधील हाय फॅट्स ने वजन वाढते. पार्श्‍वभाग आणि कमरेच्या बाजुला चरबी वाढते.

 कॉफी ः यामध्ये जास्त कॅलरीज असतात. पोटाच्या आजुबाजूला चरबी वाढते.

 रेड मीट ः यामध्ये हाय सॅच्युरेटेड फॅट्स असतात. ज्यामुळे लठ्ठपना वाढतो.

 वाईट चॉकलेट ः यामध्ये साखर अधिक प्रमाणात असते. ज्यामुळे लठ्ठपना वाढतो.  

(फिटनेस गुरु - विकास कों गायकवाड)